
मुंबई-नोटाबंदीमुळे देशातील भ्रष्टाचार कमी झाला नाही तसेच काळा पैसाही बाहेर आला नाही. नोटाबंदी फसली आहे. नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशाचे नुकसान करणारे देशद्रोही नाहीत का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दसरा मेळाव्यात केला. उद्धव म्हणाले, बुलेट ट्रेन कोणी मागितली आहे? प्राथमिक सुविधांअभावी लोकांचे हकनाक बळी जात असताना मूठभर लोकांसाठी इतका महागडा खटाटोप कशाला हवा? मोदी यांनी उरलेल्या दोन वर्षांमध्ये जीवनावश्यक पाच वस्तूंचे दर स्थिर ठेवावेत.
तूर्त सत्तेतच राहणार
महागाई, हिंदुत्व, शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेचे आंदोलन जोर धरेल. तूर्त सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे जाहीर केले.
महागाई, हिंदुत्व, शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेचे आंदोलन जोर धरेल. तूर्त सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे जाहीर केले.
आंदोलन सुरूच राहील
आपले महागाईविरोधातील आंदोलन यापुढेही सुरूच राहील. सत्तेमधून बाहेर पडण्यासाठी आम्ही मुहूर्ताची वाट पाहणार नाही.
आपले महागाईविरोधातील आंदोलन यापुढेही सुरूच राहील. सत्तेमधून बाहेर पडण्यासाठी आम्ही मुहूर्ताची वाट पाहणार नाही.
सुखी कोण? :मोदींच्या राज्यात कुणीही सुखी नाही. त्रास देण्याशिवाय मोदी सरकारने काय दिले? इकडे सत्ता, तिकडे सत्ता, कारभार मात्र बेपत्ता. पाकप्रमाणे ४०-४५ रुपयांत पेट्रोल विकले तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचू...
काय म्हणाले उद्धव ठाकरे
- संपूर्ण देशामध्ये कारभाराचा विचका झालेला आहे. चिखलातून कमळ उगवतं असं म्हणतात. पण मळ दिसतोय कमळ कुठे दिसत नाही.
- गर्दीच्या ठिकाणचे सर्वच रेल्वे पूल आणि जिने रुंद करा, फक्त मुंबईतलेच नाही तर ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील सर्व पूल, जिने रुंद करा.
- समान कर लावला असेल तर समान दरही लावा. पेट्रोल, डिझेलवरचे दरही समान ठेवा.
- संपूर्ण देशामध्ये पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवा तरच सरकार टिकेल, उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन.
- अच्छे दिन येण्याची स्वप्नं पाहात जनता जगतेय.
- मोहन भागवत यांनी रोहिंग्याचा विषय मांडला. ते आपल्याकडे घुसत आहेत. त्या रोहिंग्या मुस्लिमांना हाकला.
- सत्तेत राहून सरकारवर अंकूश ठेवतो. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शिवसेनेची भूमिका.
- नोटाबंदीवर देशात सर्वात आधी आम्ही बोललो.
- तिरंग्याशी गद्दारी शिवसेना कदापी करणार नाही. पण सत्तेसाठी तुम्ही लाचार होऊन काश्मीरमध्ये उपमुख्यमंत्री झालात.
- शिवसेना संपण्याचा प्रयत्न करून बघा. अनेक आले आणि अनेक गेले.
- लालकृष्ण अडवाणींना पंतप्रधान का केलं नाही?
- नवे मित्र जोडत आहेत. पण कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना नको झाली आहे.
- गाईला जपायचं आणि ताईला बदडायचं हे असलं हिंदुत्व आम्हाला नको.
- बेधडक राहून सत्तेत साथ देत आहोत. उघडपणे साथ देतोय. तुमच्या सारखे अदृश्य हात देऊन लपवाछपवी करत नाही, उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर बोचरी टीका.
- ज्या क्षणी हिंदुत्व फुटेल तेव्हा तुमचंही नशीब फुटेल, भाजपला इशारा
- महागाई, हिंदुत्व, महिलांचं रक्षण आणि शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने आंदोलन.
Post a Comment