
मालवण तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा नं.१ प्रशालेच्या साफसफाईच्या कामादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. झाडाच्या वाढलेल्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढलेले दीपक परब यांचा हात सुटून खाली पडल्याने जबर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे.
शाळेच्या परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्यासाठी दीपक परब झाडावर चढले होते. अचानक त्यांचा हात सुटून ते खाली कोसळले आणि त्यांना जबर दुखापत झाली. यावेळी तेथे जमलेल्या पालक व ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे येथे आणले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत तेजनकर यांनी त्यांची तपासणी केली असता ते मयत झाल्याचे सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दीपक परब यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी जाण्याने त्यांच्या कुटुंबासह चुनवरे गावावर शोककळा पसरली आहे.
Post a Comment