0
गावात पत्ते खेळण्यास बंदी,अन्यथा साफसफाईची शिक्षा; हिस्सार जिल्ह्यात लोकांचा निर्णय

कुला (फतेहाबाद)- हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील मुस्साखेडा येथे पंचायत सदस्य आणि गावातील प्रमुख व्यक्तींनी गावात पत्ते खेळण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. जर कोणी पत्ते खेळताना आढळला तर त्याला गावातील रस्ते व नाल्यांची साफसफाई करण्याची शिक्षा देण्यात येणार आहे. शिवाय ११०० रुपये दंडही आकारण्यात येईल.

मुस्साखेडा सरपंच मुकेशकुमार यांनी सांगितले, गावात बस स्थानकावर रिकामटेकडे लोक दिवसभर पत्ते खेळत असत. पत्ते खेळताना त्यांच्यात हाणामाऱ्या, शिवीगाळ चालत होती. या तक्रारी पंचायतीकडे आल्या तेव्हा पंचायतने सर्वसंमतीने पत्ते खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी घालून पंधरा दिवस झाले आता गावात शांतता आहे.

पत्त्याऐवजी चारी कोडे खेळू लागले
पत्ते खेळणाऱ्या जुगाऱ्यांनी चारी कोडे खेळण्यास सूट द्यावी अशी मागणी ग्राम पंचायत प्रमुखांकडे केली होती. चारी कोडे गावकऱ्यांचा मागील पिढ्यापासून चालत आलेला खेळ आहे. यामुळे पंचायतीने त्यांना हा खेळ खेळण्याची परवानगी दिली.

‘चारी कोडे’ टाइमपास करण्यासाठी खेळतात वृद्ध
‘चारी कोडे’ हा खेळ जमिनीवर २५ खाने तयार केले जातात. हा खेळ चार माणसे खेळू शकतात. पत्त्याऐवजी ज्यांना काही कामधंदा नाही, अशा ज्येष्ठ व्यक्ती वेळ घालवण्यासाठी हा खेळ खेळतात. पत्ते, लुडो व सापशिडी हे खेळ सुरू झाल्याने हा खेळ बंद पडला होता, अशी माहिती येथील एक ज्येष्ठ नागरिक गुलाब सिंह यांनी दिली.

Post a Comment

 
Top