0
स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू, आरोग्‍य विभाग खडबडून जागा

औरंगाबाद - शहरातील एमआयटी रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा आणि ४५ वर्षीय व्यक्तीचा घाटीत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. सुनंदा सुनील इंगळे (३७, जामनेर, जि. जळगाव) या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. ११ सप्टेंबरला त्यांना एमआयटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा स्वाइन फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला. १३ सप्टेंबरला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बबन पांडुरंग काळे (४५, रा. बालानगर, ता. पैठण) यांचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दोघांचेही नमुने मुंबईच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, दम लागणे, तीव्र श्वसन दाह आदी लक्षणे त्यांच्यामध्ये होती. एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय उपचार घेतल्याने स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे जाणवू लागल्यास नागरिकांनी घाबरून जाता जवळच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, घाटीच्या औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिला आहे.

Post a Comment

 
Top