0

संबंधित तरूणीने 15 सप्टेंबरला पोलिसांत तक्रार केली होती.पीडित तरूणीने मनोज पांडेंने जबरदस्तीने अबॉर्शन करायला भाग पाडल्याचाही आरोप केला होता.
मुंबई- चारकोप पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली भोजपुरी अभिनेता मनोज पांडेला शुक्रवारी अटक केली. आरोप होताच मनोज मागील सात दिवसापासून फरार झाला होता. पोलिसांत तक्रार दाखल करणारी तरूणी सुद्धा भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील आहे. तरूणीने आरोप केला की, मनोजने एका मोठ्या चित्रपाटत काम देण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. 15 सप्टेंबरला केली होती तक्रार.....
- संबंधित तरूणीने 15 सप्टेंबरला पोलिसांत तक्रार केली होती. ज्यानंतर पांडेवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, गुन्हा दाखल होताच मनोज फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होती.
- तरूणीच्या म्हणण्यानुसार, मनोज तरूणींसमवेत लिव्ह इनमध्ये राहायचा व शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्यांना सोडून द्यायचा.
- तरूणींना जाळ्यात ओढण्यासाठी तो स्वत:ला स्टार असल्याचे सांगायचा. मनोज पांडेने फिल्म इंडस्ट्रीत काम देण्याच्या बहाण्याने तिच्याशी मैत्री केली. 
- पीडित तरूणीने मनोज पांडेंने जबरदस्तीने अबॉर्शन करायला भाग पाडल्याचाही आरोप केला होता.
याआधी त्याच्या दाखल झाला होती केस-
- मनोज पांडे भोजपुरी फिल्मचा प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक राजकुमार आर पांडेयचाा भाऊ आहे. मनोजने 'लहरिया लूट राजा जी' आणि 'खून भरी मांग' सारख्या फिल्ममध्ये काम केले आहे. 
- मनोजवर बलात्काराचा झालेला आरोप हा काही पहिला नाही. याआधीही त्याच्यावर ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. दोन्ही पीडिता महिला वेगवेगळ्या आहेत मात्र, भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधीलच आहेत.

Post a Comment

 
Top