0
छोटी बहीण जिवाच्या आकांताने वाजवत राहिली दार, भावाने लाथ मारून तोडल्यावर हे दिसले

लखनऊ-शहरात एका 19 वर्षीय तरुणीने पंख्याला लटकून आत्महत्या केली. छोटी बहीण जिवाच्या आकांताने दार उघड म्हणत दार वाजवत राहिली, परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर तिने पळत जाऊन शेजाऱ्यांना मदत मागितली. याची माहिती कळताच भाऊही धावत-पळत आला. त्याने दार तोडून आत डोकावून पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. खोलीत पंख्याला फास लावून तिची बहीण लटकलेली होती आणि जवळच एक चिठ्ठी पडलेली होती.
असे आहे प्रकरण...
- हे प्रकरण इंदिरानगर D ब्लॉक मुन्सीपुरवातील आहे. येथे जॉनथन बक्शी त्याची पत्नी शांती, 3 मुले जॉय, बंटी, ऐफ आणि 2 मोठ्या मुली शिवानी (19), छोटी रीती यांच्यासह राहतात.
- ते यूपीच्या राज्य खनिज विकास निगममध्ये क्लास 4 कर्मचारी आहेत. सूत्रांनुसार, शुक्रवारी घरातील सर्व आपापल्या कामासाठी बाहेर निघून गेले. पत्नी आणि 2 मुली घरीच होत्या.
- आई घराबाहेर निघताच मृत शिवानीने आपल्या छोट्या बहिणीला खेळण्यासाठी घराबाहेर पाठवले. यादरम्याने तिने पंख्याला आपल्या ओढणीने फास लावून फाशी घेतली.
- मृत मुलीचा भाऊ बंटी म्हणाला, "छोटी बहीण जोरजोराने घराचा दरवाजा वाजवत होती, पण आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. यानंतर शेजाऱ्यांनी मला फोन करून याची माहिती दिली. मी धावतपळत घरी पोहोचलो आणि दारच तोडले."
- बहीण पंख्याला लटकलेली पाहून मला जबर धक्का बसला. तिच्या बाजूलाच एक चिठ्ठी पडलेली होती, यात तिने दोन ओळी लिहिलेल्या होत्या.
- घटनेची माहिती मिळताच पोलिस पोहोचले. मृतदेहाला फासावरून उतरवून त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

काय म्हणतात पोलिस?
- एसओ इंदिरानगर मुकुल प्रकाश वर्मा म्हणाले, मुलीने डिप्रेशनमध्ये येऊन हे पाऊल उचलल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे. ती सेकंड इयरची स्टुडंट होती. आणि नापास होण्याची भीतीने ती नेहमी तणावात असायची. तिच्या चिठ्ठीतही आढळले की, माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

 
Top