0

फरिदाबाद - कामावरून घरी परतणाऱ्या नेपाळी तरुणीला दोन बदमाशांनी रस्त्यावरून उचलून जंगलात धरून नेले. तिथे तिला एका झाडाला बांधले. यानंतर दोघांनी मिळून तिच्यावर गँगरेप केला. चार तास नराधमांनी तरुणीवर गँगरेप केला. जाताना गुंडांनी तिला बेदम मारहाणही केली. यानंतर तरुणीला बेशुद्धावस्थेत सोडून दोघेही पळून गेले. ती शुद्धीवर आली तेव्हा न्यूड होती. कशीबशी घरी पोहोचून तिने पतीला सर्वकाही सांगितले. सकाळी तरुणीला डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली.
 
तरुणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लागले दोन तास...
 - साधारणपणे, पोलिसांत दिलेली बलात्काराची तक्रार अर्धी खरी आणि अर्धी खोटी असते. यामुळे पोलिसांनीही अगोदर तिच्या वक्तव्यावर विश्वास ठेवला नाही.
 - तरुणीने जेव्हा तिच्या जखमा पोलिसांना दाखवल्या तेव्हा कुठे त्यांना विश्वास बसला. मग पोलिस घटनास्थळी गेले आणि रेप झालेली जागा पाहिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 - पीडितेच्या दु:खाला सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी आणखी वाढवले. तेथे मेडिकल करण्यासाठी 2 तास लावण्यात आले.
 - पीडितेने एफआयआर दाखल केली, परंतु नराधमांचा क्लू काही मिळाला नाही.

घराच्या बाहेर पडणे बंद केले आहे पीडितेने
 - पीडितेसोबत जे काही झाले, त्यामुळे तिला जबर धक्का बसला आहे. तिने कामावर जाणे सोडले आहे.
 - पीडितेच्या घरचे पोलिसांत चकरा मारून आपल्या केसची माहिती घेत आहेत. परंतु पोलिस म्हणाले की, अजून काही सुगावा लागलेला नाही, जेव्हा मिळेल तेव्हा तुम्हाला बोलवण्यात येईल.

Post a Comment

 
Top