0
पंजाबमधील तरुणीची आंबोलीत आत्महत्या; पळवून आणलेली तरुणीही बेपत्ता

मुंबई- सिंधुदुर्गातील आंबोलीच्या लॉजमधील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. पंजाबमधील तरुण जोझिंदर बलदेवसिंह विर्क (वय-25) याचा मृतदेह बुधवारी (20 सप्टेंबर) लॉजमध्ये आढळून आला होता. त्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. परंतु त्याने अमृतसर येथून पळवून आणलेली तरुणी बेपत्ता आहे. ती अमृतसर येथील एका प्राध्यापकाची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.

लॉज मालकाने काय सांगितले...?

- 'माझी गाडी बंद पडली असून माझ्यासोबतचे लोक गोव्याहून येत आहेत. तोपर्यंत मला रुम भाड्याने द्या', असे सांगत जोझिंदरने मंगळवारी (19 सप्टेंबर) दुपारी लॉजमध्ये आसरा घेतल्याचे लॉज मालकाने सांगितले.
- ओळखपत्र म्हणून त्याने पॅनकार्ड दिले होते. तशी लॉजमधील रजिस्टरमध्ये नोंद आहे.
- बुधवारी सकाळी हॉटेल मालकाने रुम कधी सोडणार, अशी विचारणा करण्यासाठी रुमचा दरवाजा ठोठावला. परंतु आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. खिडकी उघडून पाहिले असता जोझिंदरचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
- त्यांनी तत्काळ या संदर्भात आंबोली दूरक्षेत्राचे हवालदार विश्वास सावंत, गजानन देसाई यांना माहिती दिली.
- पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करुन पंचनामाही केला.
- पोलिस पुढील तपास करत आहे.

जोझिंदरच्या गाडीत सापडला कोयता, सुरी आणि रक्ताचे डाग..
- पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी आंबोलीत गाडी बंद पडल्याने जोझिंदरने लॉजमध्ये आसरा घेतला होता.
- दुसऱ्या दिवशी छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला होता.
- पोलिसांनी त्याची गाडी तपासली असता त्यात कोयता, सुरी, रक्ताचे डाग, एक चिठ्ठी आणि सीरिंज सापडले होते.
- त्यामुळे जोझिंदरने आत्महत्या केली की, त्याची कोणी हत्या केली? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

Post a Comment

 
Top