0


पवईच्या आयआयटीत राहणाऱया एका १६ वर्षीय मुलीने शनिवारी तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ऐश्वर्या खंडागळे असे त्या मुलीचे नाव आहे. घरच्यांशी वाद झाल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून समजते.
आयआयटीत राहणारी ऐश्वर्या पवईतीलच एका नामांवित शाळेत दहावीमध्ये शिकत होती. शनिवारी घरच्यांशी ऐश्वर्याचा वाद झाला. या वादाच्या रागातूनच ऐश्वर्या घरातून बाहेर पडली. घरच्यांनी तिचा रात्रभर शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी पवई पोलीस ठाण्यात ऐश्वर्या हरवल्याची तक्रार दिली. दरम्यान, ऐश्वर्याच्या कुटुंबीयांना आज जबरदस्त धक्काच बसला. पवई तलावात एका मुलीचा मृतदेह असल्याची खबर मुख्य नियंत्रण कक्षाने पवई पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला असता तो ऐश्वर्याचा असल्याचे स्पष्ट झाले. ऐश्वर्याला तिचे कुटुंबीय ओरडले होते. तिच्या एका मित्राशी बोलू नको असे त्यांचे म्हणणे होते. त्यावरून शनिवारी त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर ऐश्वर्याने हे पाऊल उचलले असे प्राथमिक तपासात समजल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

 
Top