0
फलाहारी महाराजावर छत्तीसगडच्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे.

अलवर(राजस्थान) - जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराजला शनिवारी अलवर येथून अटक करण्यात आली आहे. फलाहारी महाराजावर बलात्काराचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच महाराजाविरुद्ध छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर छत्तीसगड पोलिस अलवर येथे येणार असल्याचे कळताच फलाहारी महाराजाच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने तत्काळ आश्रम सोडला आणि एका खासगी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाला. शनिवारी अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहे. फलाहारी महाराजाच्या मधुसूदन सेवाश्रमातील ती रुम सील करण्यात आली आहे, जिथे महाराजाने तरुणीसोबत कुकर्म केले होते.

Post a Comment

 
Top