
अमरावती - जिल्ह्यात रस्त्यावरील खड्ड्याची भीषण अवस्था झाल्याने अपघाताची मालिका कायम अाहे. खड्ड्यामुळे नागरिकांचे जीव जात असताना प्रशासनाला चेव येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान खड्ड्यातून दुचाकी उसळल्याने झालेल्या अपघातात कलीम आ. बी. इब्राहीम खॉ सौदागर (वय ६०) रा. सावंगा या महिलेचा मृत्यू झाल्याची भीषण घटना १४ सप्टेेंबरला उघडकीस आली. हा भीषण अपघात ऑगस्ट रोजी रहाटगाव रिंगरोडवर सकाळी घडला. मृतक महिला पुतण्याच्या दुचाकीवर (क्रमांक एमएच-२७-वाय-२६३०) बसून जात असताना रहाटगाव रिंगरोडवरील खड्ड्यातून दुचाकी उसळली.
यात सदर महिला खाली पडली त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरीत उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु नागपूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Post a Comment