
मुंबई : नवरात्री म्हटलं की सगळीकडे धूम असते ती गरब्याची. पण प्रत्येकालाच गरबा खेळता येतो असे नाही. ज्यांना गरबा येत नाही, ते लोक स्वतःच्याच स्टेप्स तयार करुन थिरकताना दिसतात. त्यांना गरबा जमत नाही पण आवड म्हणून ते गरबा खूप एन्जॉय करतात आणि अशाच लोकांच्या गरबा स्टेप्स बघणा-यांच्या कायम लक्षात राहतात. अशाच गरबा स्टेप्सवरुन मराठी चित्रपटसृष्टीची आघाडीची नायिका तेजस्विनी पंडीत हिने एक नवीन चॅलेंज सुरु केले आहे. या चॅलेंजचे नाव आहे loserwaligarbastep (लूजरवाली गरबा स्टेप).
या चॅलेंजअंतर्गत तेजस्विनीने तिची आवडती लूजरवली गरबा स्टेप करून दाखवली आणि त्याचा व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडियावर टाकला. एका दिवसात या व्हिडीओने लाखात views मिळाले आहेत. तेजस्विनीने या व्हिडिओमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री नम्रता आवटे या तिच्या दोन जवळच्या मित्रांना #loserwaligarbastep करून दाखवण्याचे Challenge दिले आहे.
विशेष म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधवने तेजस्विनी उर्फ बंड्याचे हे चॅलेंज स्वीकारले असून त्याची झक्कास लूजरवाली गरबा स्टेप करुन दाखवली आहे. आणि आता त्याने अभिनेता उमेश कामत, कुशल बद्रिके आणि पॅडी कांबळे यांना हे चॅलेंज दिले आहे. तर नम्रतानेदेखील तेजस्विनीचे हे चॅलेंज स्वीकारुन, ''तेजुडी तूज इतकं मॅड केलंस की काण्टस्टॉप... मी चॅलेंज एक्सेपस्ट केलंय. आज तुझी स्टेप उद्या माझी स्टेप...'' असे म्हटले आहे. अद्याप नम्रताने तिचा लूजरवाली गरबा स्टेपचा व्हिडिओ शेअर केलेला नाही. पण व्हिडिओ शेअर केल्यानंतर ती हे चॅलेंज मराठी इंडस्ट्रीतील आणखी कोणकोणत्या कलाकारांना देणार, हे बघणं इंट्रेस्टिंग ठरेल हे नक्की.
Post a Comment