मुंबई- वेळ सकाळी दहा- साडेदहाची, मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतोय, चाकरमान्याची आपापल्या कार्यालयात, कामावर जाण्याची घाई, पावसामुळे अरूंद असलेल्या एलफिन्स्टन पुलावर लोक थांबल्यामुळे एकच गर्दी, ही गर्दी पांगवण्यासाठी कोणीतरी आवाज दिला, पूल कोसळला, पूल कोसळला... याच दरम्यान एक प्रवासी खाली पडला. त्याला तुडवत लोक एकमेंकांना दाबू लागले, पळायला वाट शोधू लागले. कोणी पुलावरून उडया मारू लागले... काही क्षणातच चेंगराचेंगरी झाली आणि यात तब्बल 22 जणांचा जीव गेला तर 30 हून अधिक गंभीर जखमी झाले... आणि मुंबई लोकलच्या इतिहासातील एक मोठी दुर्घटना घडली. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणा-या मुंबई शहराची लक्तरे, लक्तरे निघाली.....
एल्फिन्स्टन- परेल पुलावर नेमकं काय घडलं?
- सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.
- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
- त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.
- त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
- त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
- गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याने गैरसमजातून धावपळ सुरु झाली.
- ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले
- एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु
- सकाळी 10.30 च्या वेळी थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.
- जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- काही क्षणांत मृतांची संख्या 15 वर पोहोचली
- परेल आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते.
- अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात.
- गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत. रेल्वेच्या माहितीनुसार, या पुलावरून रोज दीड ते दोन लाख प्रवासी ये-जा करतात.

- उद्या दसरा असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी दादर आणि परिसरात जातात.
- सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे.
- त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे.
- सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे.
- त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे.
प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो, अशी ओरड नेहमीच प्रवाशांकडून होते.
- त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
- त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
- दरम्यान, ब्रिज पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Post a Comment