मुंबई- एलफिन्स्टन-परेल रेल्वे पुलावर शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यानच्या अनेक घटनांचा खुलासा होऊ लागला आहे. यातील एक घटना म्हणजे एका मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचे समोर आले आहे. या बांगड्या चोरतानाचे फोटो सोशल मिडियात शेयर होत आहेत. या महिलेची ओळख पटली असून, सुमलता शेट्टी असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याच हातातील सोन्याच्या बांगड्या एका तरूणाने लांबविल्याचे दिसत आहे. नातेवाईकांनी केली सीएम व कमिश्नरकडे तक्रार....
- सुमलता शेट्टी यांच्यातील हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्याचे फोटो समोर आले आहेत.
- यात एका व्यक्तीने सुमलता यांचे मनगट हातात पकडल्याचे दिसत आहे. तर आणखी एक व्यक्ती सोन्याच्या बांगड्या काढताना दिसत आहे.
- फोटोतील दुस-या भागात आणखी एक व्यक्ती त्यांची पर्स चेक करताना दिसत आहे. सुमलता मुंबईतील कांजूरमार्ग येथे राहत होत्या.
फुले घेऊन परतत होत्या सुमलता-
- सुमलता आपली फ्रेंड सुजातासह दस-यासाठी दादर मार्केटमधून फुले घेऊन परत येत होत्या. घटना घडली तेव्हा त्या पुलावर होत्या.
- सुमलताचे नातेवाईक गणेश शेट्टी यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही सुमलता यांचा मृतदेह घ्यायला गेलो तेव्हा त्यांच्याजवळ काहीही नव्हते. त्यांची पर्स, पैसे सोबतच अंगावरील सर्व दागिने गायब होते. मात्र, त्यांचा मोबाईल आम्हाला हॉस्पिटलमध्ये दिला गेला.
- त्याचवेळी सोशल मिडियात बांगड्या काढतानाचे फोटोज आढळून आले. अशा दुखद घटनेच्या वेळी लोक चो-या करत होते हे ऐकून खूपच लाजीरवाणे वाटतेय. मला विश्वास बसत नाहीये की असेही काही अशा घटनेवेळी घडू शकते.
- गणेश यांनी सांगितले की, आम्ही ते फोटो सीएम, मुंबई पोलिस कमिश्नर यांना टि्वट केले आहेत तसेच आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment