0


Image result for newton hindi cinema

ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या 'न्यूटन' चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. साहजिकच अभिनेता राजकुमार राव आणि दिग्दर्शक अमित मसुरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र न्यूटनमध्ये झळकलेला असा एक अभिनेता आहे, ज्याचा ऑस्करवारी करणारा हा आठवा चित्रपट आहे. हा अभिनेता म्हणजे रघुवीर यादव. अनेक चित्रपटांमधून झळकलेला मात्र प्रेक्षक-समीक्षकांकडून दुर्लक्षित राहिलेला हा चेहरा. रघुवीर यादव यांनी 'लगान'मध्ये साकारलेला भुरा सर्वांच्या लक्षात राहिला होता. रघुवीर यादव यांची भूमिका असलेले सात चित्रपट आतापर्यंत ऑस्करला पोहचले आहेत. न्यूटन हा आठवा चित्रपट आहे. सलाम बॉम्बे (1985), रुदाली (1993), बँडिट क्वीन (1993), 1947 अर्थ (1999), लगान (2001), वॉटर (2005), पिपली लाइव्ह (2010) आणि न्यूटन (2017) हे रघुवीर यादव यांची भूमिका असलेले आठ चित्रपट ऑस्करवारी करुन आले आहेत.

Image result for raghuveer yadav

गंमतीची गोष्ट म्हणजे लहानसा पुरस्कार पटकावल्यानंतरही गगनाला हात टेकणाऱ्या अभिनेत्यांपुढे रघुवीर यादव वेगळे ठरतात. पुरस्कार वगैरे गोष्टींचं आपल्याला फारसं कौतुक नसल्याचं रघुवीर यांनी सांगितलं. 'मी याबाबत कधी विचारच नाही करत. कारण अभिनेता म्हणून चांगली कामगिरी बजावण्याकडे माझं लक्ष असतं. ऑस्करला आपला सिनेमा जाणार का, याकडे मी बघत नाही. जर चित्रपट चांगला असेल, तर लोकप्रियता मिळणारच. तो त्या चित्रपटाचा हक्कच असतो' असं रघुवीर यादव यांना वाटतं. आपल्या व्यक्तिरेखेच्या निवडीबाबत मात्र रघुवीर यादव कायम सजग असतात. 'जे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतील, असं वाटतं, तेच मी करतो. जर पटकथा चांगली असेल, तर व्यावसायिक पातळीवर किंवा पुरस्कारांमध्ये सिनेमाला यश मिळेल, याची खात्री मिळते. दिग्दर्शकाची संवेदनशीलता सर्वात महत्त्वाची असते', असं रघुवीर यादव म्हणतात. 'व्यावसायिक चित्रपट चांगले नसतात, हा समज चुकीचा आहे. जर चांगल्या हेतूने चित्रपट तयार करण्यात आले, तर ते चांगलेच ठरतात. मी भूमिका केलेल्या ज्या सिनेमांना ऑस्कर नामांकन मिळालं, ते नफा-तोट्याचं गणित बाजुला ठेवून बनवण्यात आले होते.' असंही रघुवीर यादव यांनी सांगितलं.
Image result for raghuveer yadav

Post a Comment

 
Top