0


भोपाळ, दि. 22- मध्यप्रदेशात मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमसंदर्भात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तेथे ब्लू व्हेल गेमच्या फायनल टास्कमुळे घाबरलेल्या एका दहावीच्या मुलाने त्याच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत ब्लू व्हेल गेमच्या फायनल टास्कची भीती लिहून काढली आहे. ब्लू व्हेलच्या फायनल टास्कमध्ये जेव्हा त्या मुलाला आत्महत्या करायला सांगितलं गेलं तेव्हा तो मुलगा प्रचंड घाबरला होता. भीतीने त्याने ती संपूर्ण घटना उत्तरपत्रिकेत लिहिली. उत्तरपत्रिका तपासत असताना शिक्षकाला हे प्रकरण समजल्यावर त्यांनी ही संपूर्ण माहिती शाळा प्रशासनाला दिली. मुलाने उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या घटनेनंतर त्या विद्यार्थ्याला आता योग्य मार्गदर्शन केलं जात आहे. 
उत्कृष्ट विद्यालय खिलचीपूरच्या दहावी इयत्तेच्या तिमाही परीक्षेच्या वेळी संस्कृतचा पेपर सुरू असताना या विद्यार्थ्याने ब्लू व्हेलविषयी उत्तरपत्रिकेत लिहिलं. 'मी ब्लू व्हेल गेमच्या 49 व्या स्टेजवर पोहचलो आहे. आता माझ्यावर आत्महत्या करण्यासाठी दबाव टाकला जातो आहे. तसंच आत्महत्या केली नाही तर तुझ्या आई-वडिलांना मारलं जाईल, अशी धमकी दिली जाते आहे. असं त्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं आहे, असं खिचलीपूरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण प्रजापती यांनी सांगितलं आहे. या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेची तपासणी जेव्हा हेमलता श्रृंगी या करत होत्या. तेव्हा त्यांना उत्तरपत्रिका वाचून धक्का बसला. त्या मुलाने लिहिलेली संपूर्ण घटना वाचल्यावर त्यांनी शाळा प्रशासनाला त्याबद्दल सांगितलं. शाळेमध्ये सध्या शिक्षक आणि  इतर काही जणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडून त्या विद्यार्थ्याचं समुपदेशन केलं जात आहे. विद्यार्थ्याच्या मनात असलेली ब्लू व्हेलबद्दलची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 
ब्लू व्हेल, हा गेम नक्की आहे काय?
या गेममध्ये एकदा प्रवेश केला की खेळणारा मरेर्पयत काही त्यातून बाहेर पडू शकत नाही. हा ब्लू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर. तो ऑर्डर देणारा व्यक्ती अज्ञात असतो, गेममधला अदृश्य कुणी. एकदा या खेळात लॉग इन केलं की तो वेगवेगळ्य़ा आज्ञा देतो. खेळायचं तर आज्ञा पालन करणं आलंच. साधारणतर्‍ 50 प्रकारच्या आज्ञांचे टप्पे मुलांना ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेनं होते.  शेवटी खेळणार्‍याल आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं. काही शूरवीर आपलं जीवन खेळण्याच्या नादात संपवतातही!
या गेममध्ये होतं काय की  सुरुवातीला रात्री-अपरात्री उठणं, हॉरर सिनेमे एकटय़ानं पाहणे वगैरे टप्पे दिले जातात. नंतर मात्र स्वतर्‍ला इजा करुन घेणं, ब्लेडने कापून घेणं असे किळसवाणे आणि धोकादायक प्रकार करवून घेतले जातात.
सरते शेवटी चक्क आत्महत्या करण्याची ऑर्डर दिली जाते, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही मुलांनी हे टप्पे पार करुन आत्महत्या केल्याही. युलिया, कोन्स्टान्टिनोव्हा आणि व्हेरोनिका वोल्वोवा या दोन तरुण मुलींनी इमारतीवरुन उडय़ा मारल्यानंतर रशियन पोलीस एकदम सतर्क झाले. आपल्या देशात तरुणांच्या जीवाशी एक गेम खरंच खेळ करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग ब्लू व्हेलचा तपास सुरु झाला आहे. आतार्पयत शंभराहून अधिक आत्महत्या या खेळामुळे झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Post a Comment

 
Top