
हमीरपूर - यूपीच्या हमीरपूर जिल्ह्यात एका महिला सरपंचाने आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी विचित्र हट्ट केला आहे. तिचे म्हणणे आहे की, मी तोपर्यंत घुंघट घेणार नाही, जोपर्यंत तिच्या पतीविरुद्ध दाखल झालेली FIR परत घेतली जाणार नाही. महिलेने डीएम यांना अर्ज देऊन पतीविरुद्ध दाखल गुन्हा परत घेण्याची मागणी केली आहे.
असे आहे प्रकरण
- हमीरपूर जिल्ह्यातील बिंवार परिसरात 12 दिवसांपूर्वी संतोष नावाच्या व्यक्तीचा मौरंग येथे ट्रॅक्टर ट्रॉली पलटून अपघाती मृत्यू झाला होता. मृत संतोष सरपंच ज्योति सिंह यांचे पती वीरू सिंह यांचा ट्रॅक्टर चालक होता. विरमा नदीतून अवैध वाळू उपसा करण्यासाठी संतोष जात होता, तेवढ्यात खोल खड्ड्यात ट्रॅक्टर उलटला.
- ट्रॅक्टर उलटल्यानंतर संतोषचा मृतदेह तब्बल 10 तास ट्रॅक्टरखाली दबलेला होता. यामुळे गावकऱ्यांनी पोलिसांविरुद्ध मोठा हंगामाही केला होता. या सर्व घटनेनंतर मृत संतोषच्या नातेवाइकांनी वीरू सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली.
- याच केसमध्ये आपल्या पतीचे नाव हटवण्यासाठी सरपंच ज्योति सिंह गावकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचल्या. त्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी पतीला गुन्ह्यातून मुक्ती देण्याची मागणी केली आहे.
- ज्योती म्हणाल्या, हे सर्व गावातल्या विरोधकांचे षडयंत्र आहे. ते माझ्या नवऱ्याची प्रतिमा खराब करू इच्छितात. माझे पती रात्रीच्या वेळी कधीच घरातून बाहेर जात नाही. ते माझ्यासाठी परमेश्वर आहेत, त्यांना फसवण्यात आले आहे.
- मृताच्या पत्नीने माझ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, संतोष माझ्या पतीचे ट्रॅक्टर चालवत नव्हता. त्याच्या जवळ डीएलही नव्हता. निष्कारण माझ्या पतीला यात गोवण्यात आले आहे.
- आता जोपर्यंत माझे पती निर्दोष सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत मी घुंघट घेणार नाही. वास्तविक, हमीरपूरमध्ये महिला पदर घेऊन असतात. बाहेर कुठे फिरतानाही त्या घुंघट घेतलेल्या असतात.
Post a Comment