0
शिक्षणात मागास देशांत भारत दुसऱ्या स्थानी; विद्यार्थी दोनअंकी बेरीज-वजाबाकीतही नापास

वॉशिंग्टन - ग्रामीण भारतात तिसरीचे तीन चतुर्थांश विद्यार्थी किरकोळ प्रश्नही सोडवू शकत नाहीत. त्यांना दोन अंकी बेरीज-वजाबाकीही येत नाही. पाचवीतील अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी असे प्रश्न सोडवू शकत नाहीत. देशातील वाईट शिक्षण व्यवस्थेचा हा खुलासा जागतिक बँकेच्या सोमवारी जारी झालेल्या अहवालात झाला आहे. जेथील शिक्षण व्यवस्था सर्वात वाईट आहे अशा निम्न आणि मध्यम उत्पन असलेल्या १२ देशांची यादी बँकेने जारी केली आहे. त्यात मलावी पहिल्या आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण फक्त मलावीपेक्षा पुढे आहोत.
सोमवारी जारी ‘वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट २०१८-लर्निंग टू रिअलाइज एज्युकेशन्स प्रॉमिस’मध्ये म्हटले आहे की, भारतात दुसरीतील बहुतांश विद्यार्थी एका लहान वाक्याचे पहिले अक्षरही नीट वाचू शकत नाहीत. जागतिक बँकेने त्याबाबत इशाराही दिला आहे.अहवालात म्हटले आहे की, भारतासह निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या १२ देशांत सामान्य आणि अंकांशी संंबधित आधारभूत शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळेच या देशात दुसरीचे तीन चतुर्थांश मुले सामान्य वाक्याचे एक अक्षरही वाचू शकत नाहीत. आफ्रिकी देशांत सहावीचे ४७% विद्यार्थी सामान्य गणिताचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. अहवालात, शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देत नाहीत. ज्ञानाशिवायच्या शिक्षणाने गरिबी हटवणे आणि समाजात समृद्धी यांचे स्वप्न पूर्ण केले जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्ञानाचे हे संकट सामाजिक दरी आणखी वाढवत आहे.

शिक्षणाचा दर्जा घसरण्यास शिक्षकच कारणीभूत
शिक्षणाच्या संकटाशिवाय अहवालात अशी अनेक कारणे समोर आली आहेत ज्यांच्यामुळे मुले व शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. त्यातील प्रमुख अशी :
- शाळांत शिक्षकांचे गैरहजेरीचे मोठे प्रमाण.
- शिक्षकांकडे शिक्षण देण्यासाठी पात्रतेचा अभाव.
- कौशल्य विकासासाठी पुरेसे प्रशिक्षण कार्यक्रम नसणे.
- शिक्षकांत प्रभावी पद्धतीने शिकवण्याची क्षमता नसणे.
- शाळांत प्रवेशाची कमतरता किंवा आधीपासूनच विद्यार्थी कमकुवत असणे.
- विद्यार्थ्यांना कुटुंबाकडून पुरेसा पाठिंबा किंवा प्रेरणा न मिळणे.

Post a Comment

 
Top