0
अॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या त्या विकृत प्रियकराला कंटाळून पत्नीही साेडून गेली

नाशिक- शालेय विद्यार्थिनीच्या तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या विकृत प्रियकराची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात अाली आहे. गुरुवारी (दि. १४) संशयिताला अटक करण्यात अाली हाेती. न्यायालयाने त्याला मंगळवार (दि. १९) पर्यंत पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संशयिताच्या या विकृत स्वभावामुळे त्याची पत्नी सोडून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयिताने पोलिसांना तुमच्या विरोधात न्यायालयात तक्रार करेन, अशी धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

म्हसरूळ परिसरातील एका प्रतिष्ठीत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये दहावीत शिक्षण घेणाऱ्या सोळा वर्षीय मुलीची स्कूल बस अडवत तिच्या तोंडावर पाणी फेकले होते. प्रेमाला हो म्हण, नाही तर पुढच्या वेळी अॅसिड फेकेन, अशी त्याने या मुलीला धमकी दिली होती. गुरुवारी सकाळी म्हसरूळ परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला होता. संजय एेर (वय ३३) या संशयिताच्या विरोधात पोक्सो ( लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होताच म्हसरूळ पोलिसांनी त्यास राहत्या घरी अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवस म्हणजे मंगळवार (दि.१९) पर्यंन्त पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयिताची पत्नी त्याच्या विकृतपणामुळे त्याला सोडून गेली आहे. आई, भाऊ भावजय यांच्यासोबत ताे राहतो. संशयिताचे कुटुंब मूळचे नेपाळमधील असून अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये स्थायिक झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांना धमकी 
संशयितास पोलिस अटक करण्यासाठी गेले असता त्याने ‘तुम्ही मला बेदम मारहाण केल्याची तक्रार न्यायालयात करेन’, अशी पाेलिसांना धमकी दिली. विकृत स्वभावामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांना त्याने धमकी दिली होती. संरक्षणासाठी पोलिस गस्त वाढवण्यात अाली अाहे.

Post a Comment

 
Top