
मुंबई/पुणे- नवरात्र म्हटले की गरबा हा त्याचा अविभाज्य भाग ठरतो. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये तर या गरबा आणि दांडियाचा उत्साह पाहण्यासारखा असतो. मात्र आजारी व अन्य व्यक्तींना याच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणुन आता सायलंट गरबा लोकप्रिय होऊ लागला आहे. मुंबई आणि ठाण्यात मॉलमध्ये अशा गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. कानात हेडफोन लावत लोक हा गरबा खेळत आहेत.
काय खास असते या सायलंट गरब्यात
ठाण्यातील विवयाना मॉलमध्ये 9 दिवस या सायलंट गरब्याचे आयोजन करण्यात येते. येथे गरबा खेळणाऱ्यांना ब्ल्यू टुथ हेडफोन देण्यात येतो.
- येथे तुम्ही तुमच्या आवडीचे गाणे ऐकत कुणालाही डिस्टर्ब न करता खेळू शकता.
- गरबा खेळणाऱ्यांना संगीताचा आनंद घेता येतो पण याचा गरबा पाहणाऱ्यांना कोणताही त्रास होत नाही.
- यात कुणालाही त्रास होत नसल्याने संध्याकाळी 7 वाजता सुरु होणारा हा गरबा रात्री उशिरापर्यंत सुरु असतो.
- यात कुणालाही त्रास होत नसल्याने संध्याकाळी 7 वाजता सुरु होणारा हा गरबा रात्री उशिरापर्यंत सुरु असतो.
- ध्वनीप्रदुषण कमी करण्याचा संदेश या गरब्यातुन देण्यात येत असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
Post a Comment