0
महिला कैदीने अशी सांगितली आपबीती: जेलमध्ये पोलिस करत होते अत्यंत क्रूर अत्याचार


बीजिंग- चीनच्या डिटेंशन सेन्टर्स आणि लेबर कॅम्पमध्ये तीन वर्षे शिक्षा भोगून आलेल्या एका महिला कैदीने तिच्यावर झालेल्या क्रूर अत्याचाराची कहाणी कथन केली होती. जिन्ताओ लियु असे या महिलेचे नाव आहे. ती सिडनीत राहाते. 2006 ते 2009 हा तीन वर्षींचा काळ तिच्यासाठी प्रचंड कठीण होता. या काळात तिला जिवंतपणी मरण यातना भोगव्या लागल्या.

बीजिंग डिटेंशन सेंटर आणि लेबरमध्ये ती कैद होती. इलेक्ट्रिक शॉकपासून सेक्शुअल असॉल्ट, दिवस-रात्र उभे ठेवणे इतकेच नव्हे तर प्रायव्हेट पार्टमध्ये टॉयेलट क्लिन करण्याचा ब्रश टाकणे, असे अत्यंत क्रूर अत्याचार तिच्यावर करण्‍यात आले होते.

काय होता लियूचा गुन्हा...?

- 'फालुन गोंग' नामक एका स्प्रिचुअल मूव्हमेंटची लियू सदस्य होती. चीनी सरकारने ही संघटना अवैध ठरवली होती.
- डिटेंशन सेंटरमध्ये तिच्यावर चीनी पोलिसांनी अमानुष अत्याचार केले. लियुने सांगितले की, तिला 24 तास उभे ठेवले जाते होते. तिच्या नखांमध्ये टाचण्या टोचल्या जात असत. इतकेेच नााही तर तिला इलेक्ट्रिक शॉक दिले जायचे. या काळात तिच्यावर लैंगिक अत्याचारही झाले.
- चीनी पोलिसांनी तिच्यावर अतोनात अत्याचार केले. चार गार्ड्‍स तिला ‍विवस्त्र करायचे. नंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टॉंयलेट स्वच्छ करण्याचा ब्रश घालत होते.

Post a Comment

 
Top