0
आश्रय देण्याच्या बहाण्याने तीन तरुणींनी साथीदाराला तिच्यावर अत्याचार करायला लावल्याची धक्कादायक माहिती आहे.

नागूपर- कॉल सेंटरमध्ये नोकरीला असलेल्या एका 21 वर्षीय तरूणीवर शीतपेयात गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे तिच्या मैत्रिणींनी रचलेल्या षडयंत्रामुळेच तिच्यावर तीन ते चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले आहे. यातील दोन मैत्रिणींना अटक केली आहे तर एक मैत्रिण व एक युवक फरार झाले आहेत. आश्रय देण्याच्या बहाण्याने तीन तरुणींनी साथीदाराला तिच्यावर अत्याचार करायला लावल्याची धक्कादायक माहिती आहे. नागपुरातील हुडकेश्वर भागात ही घटना घडली.
याबाबतची माहिती अशी की, पीडित तरूणी सामान्य घरातील आहे. तिला तीन मोठ्या बहिणी आहेत. त्यामुळे आई-वडिलांचे तिच्याकडे दुर्लक्ष होत होते. या परिस्थितीतही तिने बी कॉमचे शिक्षण पूर्ण केले व नुकतीच कॉल सेंटरमध्ये कामाला लागली. तिथे तिची ओळख सुप्रिया नावाच्या तरूणीसोबत झाली. पुढे चांगल्या मैत्रिणी झाल्याने पीडित तरूणीने तिला आपल्या घरची परस्थिती सांगितली. त्यामुळे सुप्रियाने पीडितेला आपल्याकडे आश्रय देऊ केला. पीडिता निराधार असल्याचे पाहून सुप्रियाच्या डोक्यात तिसराच विचार सुरु झाला. सुप्रियासोबत लीना नावाची एक तरूणी राहत होती.
काही काळानंतर पीडित तरूणीला सुप्रिया व लीनाचे वागणे संशयास्पद वाटू लागले. त्यामुळे तिने तेथून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 19 सप्टेंबर रोजी सुप्रिया व तिच्या दोन मैत्रिणींनी पीडितेला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे काही वेळात पीडित तरूणी बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यावर पीडित तरूणीवर एका युवकाने बलात्कार केला. मात्र, संबंधित तरूणीचे तिच्यावर अनेक काळ अत्याचार झाल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या दिवशी तिच्यावर तीन-चार युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा संशय आहे.
पीडित तरूणी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिला प्रचंड वेदना होत होत्या. मात्र, कोणाला सांगितल्यास किंवा पोलिसांत गेल्यास जीवे मारण्याची धमकी तीन मैत्रिणी असलेल्या तरूणींनी दिली. त्यामुळे मागील आठवडाभर ही तरूणी दहशततीत होती. अखेर त्या तरूणीने रविवारी पोलिस ठाणे गाठले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाचा फोडली. यानंतर पोलिसांनी पीडितेच्या मैत्रिणी सुप्रिया आणि लीना यांना अटक केली आहे तर आणखी एक मैत्रिण आणि युवक फरार झाले आहेत. नागपूरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

 
Top