0
अतिवृष्टीचा दणका, पुन्हा अनेक घरांत पाणी; शहरात पावसाचे दोन बळी

औरंगाबाद - बुधवारच्या ढगफुटीने शहराची दाणादाण उडवली असतानाच शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसानेही शहराची चांगलीच दमछाक केली. शुक्रवारी दुपारी ३.१५ ते अशा पाऊण तासात ६०.२ मिलिमीटर पाऊस झाल्याने शहराच्या अनेक भागांत पाण्याचा निचराच झाल्याने ते पाणी थेट वसाहतीतील घरे गल्ल्यांत शिरले. दुपारी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. रात्री ११.३० पर्यंत शहरात या मोसमातील सर्वाधिक ८२.४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे वर्दळीच्या जालना रोडवरील वाहतूक पुन्हा खोळंबली. चिकलठाणा भागात घराचे छत कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. जयभवानीनगर, मयूर पार्क भागात तुंबलेले पाणी काढण्यासाठी अग्निशमन विभागाला पोहोचणेही अवघड झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या ढिम्म कारभाराचे पुन्हा वाभाडे निघाले.
जयभवानी नगरात पालकमंत्र्यांना घेराव
बुधवारच्या पावसाने जयभवानीनगरातील अनेक घरांत पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांचे दोन दिवस चांगलेच हाल झाले. पालकमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी सायंकाळी जयभवानीनगरातील गल्ली क्रमांक ते ११ ची पाहणी केली. त्या वेळी त्यांना महिलांनी घेराव घातला.
मयूर पार्क परिसरात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी 
मयूर पार्क परिसरातील मारुतीनगर, म्हसोबानगर, ऑडिटर सोसायटी, भगतसिंगनगर, हर्सूल जाधववाडी परिसरात सर्वत्र तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती.
पाच फुटांवरील दिसणेही कठीण 
पाऊस आणि धुकेसदृश परिस्थितीमुळेे शहागंज, औरंगपुरा, चिकलठाणा, जालना रोडवर तर पाच फुटांवरील दिसणे कठीण झाले होते.त्यामुळे जालना रोडवर वाहतूक खोळंबली होती.

- भावसिंगपुरा, कैलासनगर स्मशानभूमी मंदिर, बुढीलेन परिसरातील अनेक दुकानांत पाणी. 
- मुकुंदवाडी रेल्वे रुळावर पाणी साचले होते. यासोबत मुकुंदनगर, स्वराजनगर, जिजाऊनगर भागात नाले तुडुंब भरून वाहिल्याने घराघरांत पाणी. 
- विमानतळाच्या सुरक्षा भिंतीजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. 
- होनाजीनगरमध्ये शुक्रवारच्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य पाण्यात गेले.
सोयगावात सर्वाधिक, वैजापुरात सर्वात कमी 
औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ६७५.४६ मिमी पाऊस होतो. 1 जून ते १५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात झालेला पाऊस असा (आकडे मिलिमीटरमध्ये): औरंगाबाद- ५४१.३५, फुलंब्री-५३०.४५, पैठण-५१७.५०, सिल्लोड-६५०.२०, सोयगाव- ७६८.५०, वैजापूर-३८३.८०, गंगापूर- गंगापूर ४६७.१५, कन्नड-६१४.५५, खुलताबाद- ६५१.४० एकूण - ५४४.९३ 

Post a Comment

 
Top