0


मुंबई/बेळगाव- बहिणीच्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिच‍ी गळा घोटून निर्घृण हत्या करणार्‍या नराधम मामाच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मामा- भाचीच्या नात्याला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी गावच्या शिवारात घटना घडली आहे.

चॉकलेटचे आमिष दाखवून गावाबाहेरील उसाच्या शेतात नेले...
- मिळालेली माहिती अशी की, उदाप्पा (29) असे पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.
- ही घटना कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी गावच्या शिवारात गुरुवारी (21 सप्टेंबर) दुपारी घडली आहे.
- नराधमाने भाचीला चॉकलेटचे आमिष दाखवून गावाबाहेरील उसाच्या शेतात नेले.
- उसाच्या शेतात त्याने चिमुरडीवर अत्याचार केला. चिमुरडी वेदनेने विव्हळत असताना तिचा आवाज बंद करण्यासाठी नराधमाने तिच्या तोंडात माती कोंबली. नंतर तिला मातीत अर्धवट पुरले.
- हे दुष्कृत्य करून तो घरी आला तेव्हा मुलगी बेपत्ता झाले म्हणून शोधाशोध सुरू होती.

- धक्कादायक म्हणजे नराधमाने देखील मुलीला शोधाशोध करण्याचे नाटक केले.
- पण गावातील काही लोकांनी आरोपी उदाप्पा याने मुलीला नेल्याचे सांगितले. त्याला विचारले असता तो कबलला नाही.
- अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर त्याने आपल्या राक्षसी कृत्याची कबुली दिली.

Post a Comment

 
Top