0
नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेला ट्रॅक्टरने चिरडले; पोटातील बाळ बाहेर फेकले गेल्याने बचावले


पातूर (जि. अकोला)- पत्नीला प्रसववेदना सुरू होताच रुग्णवाहिकेसाठी पतीने आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकावर फोन केला. रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून पती-पत्नी दुचाकीवर रुग्णालयाकडे निघाले. मात्र, शौचालयाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने (एमएच २९, व्ही ४२४६) दुचाकीला धडक दिली आणि गर्भवती महिला ट्रॅक्टरखाली चिरडली गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर गर्भातून बाहेर पडलेले बाळ मात्र बचावले.

पातूर स्टेशन अंतर्गत कार्ला-आलेगाव रोडवर २२ सप्टेंबरला दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अरुणा सुपाजी दांदळे (२५) असे मृत महिलेचे नाव आहे. तिला तीन मुली आहेत.

अपघातानंतर जन्मलेले चौथे अपत्यही मुलगीच आहे. दरम्यान, असोला येथील गजानन सरोदे यांनी फिर्याद दिल्यावरून ट्रॅक्टर चालक दत्ता भराडी याच्याविरुद्ध कलम ३७९, ३३७, ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.

रुग्णवाहिका फक्त नावालाच
पातूर तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्राला गर्भवतींसाठी रुग्णवाहिका असतानाही १०८ वर फोन करून रुग्णवाहिका बोलावण्याचा सल्ला दिला जातो. त्यातूनच हा भीषण अपघात झाला. 

Post a Comment

 
Top