0
'पप्पा, तुम्ही पुढे व्हा, गर्दी कमी होताच मी येते'! श्रद्धाचे ते शब्द शेवटचेच ठरले

मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका 25 वर्षाच्या श्रद्धा वर्पे या तरूणीचाही समावेश आहे. श्रद्धा या गर्दीत आपले वडिल किशोर वर्पे (57) यांच्यासोबत अडकली होती. गर्दी पाहून श्रद्धाने वडिलांना म्हटले की, "पप्पा तुम्ही पुढे जा, मी गर्दी कमी झाल्यावर येते.'' वडिल किशोर यांनी सांगितले की, श्रद्धाचे हे शेवटचे शब्द ठरले. आणि त्यानंतर फक्त 10 मिनिटात सर्व काही संपले."
मुलीचे शेवटचे शब्द आठवून रडत होता पिता-
- पिता किशोर एलफिन्स्टन एफओबीवरील गर्दीतून कसे तरी बाहेर पडण्यास यशस्वी झाले. यानंतर चेंगराचेंगरी माजली. 
- किशोर अश्रू ढाळत म्हणाले, "जेव्हा चेंगराचेंगरी माजली होती तेव्हा मी मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कुठेच दिसली नाही. तिचे दर्शन मला केईएममध्येच मृत स्थितीत झाले.'
- किशोर आपल्या नातेवाईकांसह केईएम हॉस्पिटलमधील मर्चुरीत गेले जेथे, 22 मृतदेह ठेवले गेले होते. किशोरला त्यावेळी काहीच कळत नव्हते. ते हॉस्पिटलच्या एका कोप-यात बसले होते व मुलीच्या आठवणीने अश्रू ढाळत होते.
एकाच ठिकाणी नोकरी करायचे पिता-मुलगी
- श्रद्धा आणि तिचे पिता किशोर एलफिन्स्टन रोडवरील लेबर वेलफेयर बोर्डात एकाच ठिकाणी काम करायचे आणि विठ्ठलवाडीत राहत होते. 
- दोघे शुक्रवारी सकाळी 10.15 वाजता परेल स्टेशनवर पोहचले तेव्हा पुलावर नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्याचवेळी अचानक पाऊस झाला आणि पुलावर गर्दी वाढली.
10 मिनिटात सर्व काही संपले-
- किशोरचे नातेवाईक धूलप यांनी सांगितले की, लोकांवरून किशोर कसे तरी पुढे गेले मात्र, त्यांची मुलगी श्रद्धा मागे राहिली. किशोर यांनी ओरडून मुलीला आवाज दिला, मात्र, श्रद्धा म्हणाली की, गर्दी कमी झाल्यावर मी येते. दुस-या बाजूला गेल्यावर किशोर यांनी मुलगी श्रद्धाला फोन लावला पण उत्तर मिळाले नाही. धूळप म्हणाले, सर्व काही 10 मिनिटांत संपले होते.

Post a Comment

 
Top