0
हा तरुण फेसबुकवर तुमचा मित्र असेल तर व्हा अलर्ट!, तरुणींची अशी करतो फसवणूक

ग्वाल्हेर - ही बातमी तरुणींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. फोटोत दिसत असलेला तरुण तुमचा मित्र असेल तर त्याच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नका. हा तरुण बनावट नावाने फेसबुक प्रोफाइल बनवून तरुणींशी मैत्री करतो आणि मग त्यांच्याशी इमोशनल नाटक करून प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. एका तरुणीने याच्या फसवणुकीला बळी पडून त्याच्याशी लग्नही केले, परंतु या पठ्ठ्याने दुसरे लग्न करून दुसरी बायको घरात आणल्याची याची पोलखोल झाली. आता प्रकरण पोलिसांत आहे.
 
असे आहे प्रकरण...
 - तारागंज परिसरात राहणाऱ्या अरमान खानने अमन झा या नावाने फेसबुकवर प्रोफाइल बनवली. त्याने या फेक प्रोफाइलच्या माध्यमातून ग्वाल्हेरातील एका तरुणीशी मैत्री केली.
 - यात त्याने स्वत:ला जयपूरमधील एका कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगितले आणि तरुणीशी प्रेमाचे नाटक केले. त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसून तरुणीही भावुक झाली, मग ही गोष्ट लग्नापर्यंत येऊन ठेपली.
- अमन बनलेल्या अरमानने तरुणीच्या वडिलांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, तो अनाथ आहे आणि स्वबळावर शिकून-सवरून जयपूरमध्ये एका कंपनीत काम करत आहे. अरमानच्या या बतावणीने तरुणीचे पालकही इम्प्रेस झाले.
- अमनने तरुणीशी याच वर्षी 4 मार्च रोजी धुमधडाक्यात लग्न केले. लग्नानंतर तरुणी अमनसह जयपुरात गेली.
 
दुसऱ्या लग्नामुळे अमनचा झाला पर्दाफाश
- 7 एप्रिलला तरुणी घरी होती तेव्हा अमन त्याच्यासह एका महिलेला घरी घेऊन आला. अमन म्हणाला की, ही महिला त्याची पत्नी आहे आणि आजच दोघांचे लग्न झाले आहे. हे ऐकून तरुणी हैराण झाली.
- दरम्यान, अमनचे रहस्य कळले की त्याचे खरे नाव अरमान खान आहे आणि त्याने नाहिदाशी दुसरे लग्न केले आहे.
- दुसऱ्या लग्नानंतर अरमानचे आईवडील कनिजा बेगम आणि भुरे खान आले आणि सर्वांनी मिळून तरुणीवर धर्मपरिवर्तनाचा दबाव टाकला. तरुणीने धर्म परिवर्तन करायला साफ नकार दिला.
 
धर्म बदलायला नकार दिल्याने ठेवले बांधून
- यानंतर तरुणीला अरमान आणि त्याच्या घरच्यांनी बांधून ठेवले आणि तिला जबरदस्त मारहाण केली. यानंतर सप्टेंबर महिन्यात अरमानची दुसरी पत्नी नाहिदाने तिला घराबाहेर काढले. यानंतर अरमान तिला घेऊन ग्वाल्हेरच्या तारागंज परिसरात आला.
- येथे तरुणीला अरमान आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, पण ती कशीबशी त्यांच्या तावडीतून पळाली. येथून पळून तिने सरळ तिच्या बहिणीचे घर गाठले. आणि मग ग्वाल्हेर पोलिसांत गेली.
 
पोलिस घेताहेत अरमानचा शोध
- तरुणीने तिची झालेली फसवणूक आणि मारहाणीची घटना पोलिसांना सांगितली. याप्रकरणी टीआय मदन मोहन मालवीय म्हणाले की, प्रकरणाची नोंद करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे.
 
फेसबुकवर अरमानचे एक नव्हे अनेक फेक प्रोफाइल
- तरुणीने पोलिसांना अरमानचे सर्व फेसबुक प्रोफाइल आणि ईमेलची माहिती, तसेच लग्नाचे फोटोग्राफ, पत्रिका आदी दिले आहे. ती म्हणाली की, त्याने वेगवेगळ्या नावाने फेसबुकवर फेक प्रोफाइल बनवलेल्या आहेत.
- दुसरीकडे, हिंदू वाहिनीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे, पोलिसांनी यावर त्वरित कारवाई करावी.

Post a Comment

 
Top