0
पती होता ड्यूटीवर, भावजयीला घरी एकटी पाहून दीराने केले असे काही

गाजियाबाद - यूपीच्या साहिबाबादमध्ये बुधवारी एका व्यक्तीने आपल्या भावजयीची गळा चिरून हत्या केली. यानंतर स्वत: पोलिसांत पोहोचून म्हणाला-  मीच भाभीचा खून केला आहे. पोलिसांना आरोपीला अटक केली. आरोपीच्या म्हणण्यानुसार, भावजयीने त्याच्यावर लैंगिक संबंधांसाठी दबाव आणला होता व ही गोष्ट त्याला नको होती. त्याचा याला नकार होता. परंतु उलट त्यानेच बलात्काराच्या प्रयत्नात खून केल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
घरात एकटीच होती भावजयी, तेवढ्यात आला दीर आणि...
- हे प्रकरण साहिबाबाद परिसरातील आहे. पोलिसांनुसार, बुधवारी रात्री 10.30 वाजता अनिता (29) घरात एकटीच होती. तिचा पती मेट्रोमध्ये ठेकेदारी करतो. तेवढ्यात तिचा दीर आकाश घरी आला आणि दोघांत एका गोष्टीमुळे वाद झाला.
- यानंतर आकाशने अनिताच्या गळ्यावर चाकूने अनेक वार केले, यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला.  वहिनीचा खून करून दीर स्वत: पोलिसांत हजर झाला आणि गुन्हा कबूल केला.
- साहिबाबाद पोलिस इंचार्ज राकेश सिंह म्हणाले- आकाशने जबाब दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घटनास्थळी भेट दिली. खोलीतील अस्ताव्यस्त पडलेले सामान पाहून दोघांत कडाक्याचे भांडण झालेले वाटत होते.
 
यामुळे केला दीराने भावजयीचा खून 
- एएसपी अनुप कुमार म्हणाले, आरोपी अनिता दूरचा दीर होता. अनिताच्या नवऱ्यानेच आकाशचा स्वभाव पाहून त्याला आपल्या सोबतच राहू दिले होते.
- चौकशीत आरोपी आकाश म्हणाला- अनिता मला पसंत करू लागली होती. आणि सातत्याने शारीरिक संबंध बनवण्याचा दबाव आणत होती. मनाई केल्यावर अनेक प्रकारे माझा छळ करू लागली होती.
- बुधवारी रात्रीही असेच झाले. आकाश घरी पोहोचला आणि अनिता त्याला शारीरिक संबंधांचा आग्रह करू लागली होती. यामुळे आरोपीने संतापून जवळ असलेल्या चाकूने तिच्यावर सपासप वार केले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
- आरोपी गुन्हा कबूल करताना सांगितले की, तिच्या नवऱ्याला मी भावापेक्षाही जवळचा मानत होता. त्याला धोका द्यायचा नव्हता. जर मी वहिनीचे ऐकले असते तर त्याच्या विश्वास तोडला असता आणि जगानेही माझ्यावर छी-थू केली असती.
- सूत्रांनुसार, याप्रकरणी आरोपी खरे बोलतोय का याचाही तपास सुरू आहे. उलट आरोपीनेच भावजयीवर बलात्काराचा प्रयत्न केला असेल आणि तिने नकार दिल्यावर तिचा असा निर्घृण खून केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Post a Comment

 
Top