0
सेरेनाला आपण ब्लॅक आणि महिला असल्याची खंत, वाचा का बनणार होती पुरुष!

स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड चॅम्पियन टेनिस स्टार सेरेना विलियम्स 26 सप्टेंबर रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. मैदानापेक्षा मैदानाबाहेरील कामगिरीमुळे अधिक चर्चेत असणाऱ्या खेळाडूंपैकी ती एक आहे. गतवर्षी तिने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. आपल्याला ब्लॅक आणि महिला असल्याची खंत वाटते असे ती म्हणाली होती. एवढेच नव्हे, तर तिने पुरुष होण्याची इच्छा देखील व्यक्त केली.

नेमके काय म्हटले होते...
- सेरेना म्हणाली, खेळांमध्ये महिलांच्या यशाला पुरुषांइतके महत्व दिले जात नाही. 
- एखाद्या पुरुष खेळाडूने केलेल्या छोट्याशा अचीव्हमेंटचे जगभर कौतुक केले जाते. प्रत्येक ठिकाणी अतिश्योक्तीपूर्ण चर्चा केल्या जातात. 
- 22 ग्रॅन्ड स्लॅम जिंकलेली 36 वर्षांची सेरेनाला याचे दु:ख वाटते की, टेनिसमध्ये एवढे मोठे यश मिळवूनही तिला आवश्यक तसा दर्जा अद्याप मिळालेला नाही. 
- एवढेच नव्हे, तर आपण पुरुष असते आपल्या यशाबद्दल साऱ्या जगाने मला खांदयावर उचलले असते असेही ती पुढे म्हणाली. तिच्या या मुलाखतीनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काहींनी तिच्या बिनधास्त बोलण्याचे कौतुक केले. तर, काहींनी तिच्यावर टीका केली.

Post a Comment

 
Top