0
ही मुले एकाच वेळी अनेक लोकांचे अन्न खातात.

मुंबई- जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद अब्दुलाती हिचे सोमवारी पहाटे अबुधाबीत एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तिला बेरियाट्रिक सर्जरी करण्यासाठी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इजिप्तमधून मुंबईत आणले गेले होते. इमानचा मृत्यू किडनी फेलियर्स आणि आतड्यात जखमा झाल्याने झाला. तिच्यावर उपाचार मुंबईतील फेमस बेरियाट्रिक सर्जन डॉ मुज्ज्फल लकडावाला यांनी केले होते. डॉ लकडावाला इमानप्रमाणेच देशातील सर्वात लठ्ठ मुले अशी ओळख असलेल्या गुजरातमधील तीन मुले योगिता, अनिशा आणि हर्ष या भावंडावर करत आहेत. वाढत्या वजनाने त्रस्त आहे कुटुंबिय...
- इमान अहमद मुंबईत गेल्यानंतर काही दिवसांनी सैफी हॉस्पिटलमध्ये लठ्ठपणाने त्रस्त गुजरातची तीन भावंडे योगिता, अनिशा आणि हर्ष दाखल झाली होती. 
- 7 वर्षाची योगिता 45 किलो, पाच वर्षाचा अनिशा 60 किलो आणि 3 वर्षाचा हर्षाचे वजन 25 किलो आहे. 
- मुलाच्या काकाच्या म्हणण्यानुसार, इमान मुंबईत दाखल झाल्याचे कळल्यानंतर डॉ. लकडावाला यांच्याशी कुटुंबियाने संपर्क साधला."
एकाच वेळी खातात अवेक लोकांचे अन्न-
- या भावडांचे वडिल रमेश भाई नंदवाने एक शेतकरी आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्या मुलाच्या उपचारासाठी किडनी विकायला तयार असल्याचे म्हटले आहे.
- योगिता आणि अनीषा एका वेळी 18 रोटी, दीड किलो भात, दो वाट्या भाज्या, बिस्किटांची पाच पॅकिटे, 12 केळी आणि एक लीटर दूध खातात. 
- जेव्हा या भावडांना भूख लागते तेव्हा आई प्रागना बेन हिला दिवसभर जेवण बनवावे लागते. 
- त्यांनी सांगितले की, माझ्या दिवसाची सुरुवात 30 रोटी आणि एक किलो भाजी बनविण्याने होते. मुलांची भूख संपतच नाही ते सतत खात असतात व संपले की मागतात. जेवायला दिले नाही तर रडतात. त्यामुळे मला दिवसभर किचनमध्ये राहावे लागते."

Post a Comment

 
Top