0
म्यानमार सीमेवर लष्कराची कारवाई; अनेक नागा बंडखोरांचा खात्मा, तळही केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली- भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे पावणेपाचला म्यानमार सीमेवर कारवाई केली. बंडखोरांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडचे (एनएससीएन-के) अनेक बंडखोर मारले गेले. अनेक तळ उद््ध्वस्त झाले. लष्करी सूत्रांनुसार, कारवाईत २५ ते ३० बंडखोर मारले गेले.
प्रारंभी हे सर्जिकल स्ट्राइक मानले जात होते. मात्र, सीमा न ओलांडता कारवाई केल्याचे लष्कराने म्हटले आहे. यात भारतीय लष्कराचे काहीही नुकसान झालेले नाही. गेल्या वर्षी २८-२९ सप्टेंबरला व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला एक महिना पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची ठरते.
कारवाई सुरू होताच काही पळाले, काही मारले गेले
पहाटे गस्त घालणाऱ्या भारतीय तुकडीवर अज्ञात बंडखोराने गोळीबार केला. यानंतर जवानांनी कारवाई सुरू केली. यामुळे बंडखोरांचा आपसातील संपर्क तुटला आणि ते पळून गेले. मारल्या गेलेल्या बंडखोरांची संख्याही मोठी आहे.
- लष्कराच्या पूर्व आघाडीचे वक्तव्य
... यामुळे लष्कर या कारवाईला सर्जिकल स्ट्राइक म्हणणे टाळतेय
म्यानमारशी भारताचे द्विपक्षीय संबंध चांगले आहेत. बंडखोरांच्या घुसखोरीचा विषय सोडला तर दोन्ही देशांत दुसरा कोणताही तणावाचा मुद्दा नाही. त्यामुळे ही कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राइक आहे म्हटले तर म्यानमार कायमचा दुखावला जाऊ शकतो. कारवाईनंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही कारवाईवर भाष्य न करता म्यानमारशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे नमूद केले.
जून-२०१५ : शंभराहून अधिक बंडखोरांचा केला होता खात्मा
भारतीय लष्कराने ९ जून २०१५ रोजी म्यानमार सीमा ओलांडून बंडखोरांच्या दोन छावण्या उद्ध्वस्त केल्या होत्या. यात १०० हून अधिक बंडखोर मारले गेले होते. ४ जून २०१५ रोजी बंडखोरांच्या एका हल्ल्यात मणिपूरमधील चंदेल भागात १८ भारतीय जवान शहीद झाले होते. याचा बदला म्हणून लष्कराने म्यानमारमध्ये घुसून ही थेट कारवाई केली होती.
भारतीय लष्कराने ९ जून २०१५ रोजी म्यानमार सीमा ओलांडून बंडखोरांच्या दोन छावण्या उद््ध्वस्त केल्या होत्या. यात १०० हून अधिक बंडखोर मारले गेले होते. ४ जून २०१५ रोजी बंडखोरांच्या एका हल्ल्यात मणिपूरमधील चंदेल भागात १८ भारतीय जवान शहीद झाले होते. याचा बदला म्हणून लष्कराने म्यानमारमध्ये घुसून ही थेट कारवाई केली होती.
45 वर्षात भारतीय सैन्याने सीमापार केले 6 ऑपरेशन
- 1971: आपले सैन्या बांगलादेशात घुसले होते. 
- 1987: 50 हजार जवान श्रीलंकेच्या जाफना मध्ये तैनात.
- 1988: 1400 कमांडो मालदीव मध्ये पाठवले. 
- 1995: बंडखोरांविरोधात म्यानमारमध्ये ऑपरेशन. 
- 2015: म्यानमार सीमापार करुन दुसऱ्यांदा कारवाई. 
- 2016: PoK मध्ये सर्जिकल स्ट्राइक
.

Post a Comment

 
Top