0
फाईल फोटो...

मुंबई- मुंबईतील चेंबूर परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीतील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सोसायटीतील सुरक्षारक्षकाने एका कुत्र्यावर सलग तीन दिवस लैंगिक अत्याचार केल्याचे समोर येत आहे. राम नरेश (वय 41) असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे, सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजमुळे हा घृणास्पद प्रकार उघडीस आला आहे. याबाबतचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलने दिले आहे.
यात दिलेल्या वृत्तानुसार, चेंबूर नाका परिसरातील राम नरेश सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. मागील आठवड्यात राम नरेश सोसायटीतील कुत्र्याला बाथरूममध्ये घेऊन जात होता. बाथरूममध्ये जाताच तो पाच ते सात मिनिटे दरवाजा लॉक करायचा व बाहेर यायचा.
सोसायटीच्या सचिव अस्मिता देशमुख यांना याबाबत संशय आला. त्यांनी सोसायटीतील सदस्यांना घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. यात राम नरेशने मागील आठवड्यात सलग तीन दिवस कुत्र्याला बाथरूममध्ये घेऊन जाताना दिसला. त्यामुळे राम नरेश कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करावा असावा असा संशय आला. त्यानंतर त्या कुत्र्याला व्हेटरनेरी डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी कुत्र्याच्या पार्श्वभागात वेदना होत असल्याचे जाणवले. यानंतर पोलिसांनी राम नरेशला अटक केली.
राम नरेश हा खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत तेथे नियुक्तीवर होता. तो दिवसा रिक्षा चालवायचा तर रात्री सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत असे. दरम्यान, राम नरेशचा हा घृणास्पद व किळसवाणा प्रकार समोर येताच नागरिकांनी व प्राणी हक्कासाठी लढणा-या पेटाच्या कार्यकर्त्यांनी त्याला कठोरात कठोर कारवाई व शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
मागील काही वर्षात जगभर प्राण्यांवर लैंगिक अत्याचार वाढले आहेत. प्राण्याच्या पूर्वीपासून शिकार केली जाते. नंतर त्याला व्यवसाय-उद्योग म्हणून पाहिले गेले व यात दरवर्षी हजारो प्राणी मारली जातात, शिकार ठरतात. आता प्राण्यांवरही लैंगिक अत्याचारात वाढ झाली आहे. त्यामुळे मानवी विकृती कोणत्या दिशेला चालली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

 
Top