0
बहिणीने केले बदनाम, भावाने प्रेग्नंट पत्नीसह वापरली एकच दोरी अन् एकच हूक

लुधियाना- बहिणीच्या कुकर्मामुळे गावात बदनामी होत असल्याने तणावात येऊन तरुणाने आपल्या प्रेग्नंट पत्नीसह एकाच दोरीने आणि एकाच हुकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नवऱ्याला घटस्फोट देऊन बहीण माहेरात राहत होती. आणि यादरम्यान तिचे एका सावकाराशी लैंगिक संबंध झाले होते. अख्ख्या गावात याची चर्चा सुरू होती.
असे आहे प्रकरण...
- हे प्रकरण हठूरमधील डल्लाह गावाचे आहे. पोलिसांना घटनास्थळावरून 10 पानी आत्महत्येची चिठ्ठीही मिळाली आहे.
- गुरुवारी सकाळी सव्वा 6 वाजता आईने खोलीत मुलगा आणि सुनेला लटकलेले पाहिले.
- सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी मृताच्या बहिणीला ताब्यात घेतले आहे. सावकारावरही कारवाई होणार आहे.
- डल्लाह येथील ट्रक ड्रायव्हर गुरदीपचे लग्न जानेवारीमध्ये हरमितशी झाले होते. गुरदीपला दोन बहिणी आहेत.
- पैकी एक बहीण मंदीप कौरचा दीड वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता.
- घटस्फोटानंतर मंदीप 8 वर्षांच्या मुलासह माहेरात राहत होती. माहेरात गुरदीप, त्याची पत्नी आणि आई राहते.
- येथे मंदीप कौरचे रायकोटच्या एका सावकाराशी अवैध लैंगिक संबंध बनले.
- गुरदीपच्या गैरहजेरीत सावकार घरी यायचा आणि मंदीप कौरशी संबंध बनवायचा. गावात याची चर्चा होत असल्याने बदनामी होऊ लागली.
10 पानी चिठ्ठी
- सुसाइड नोटमध्ये गुरदीपने लिहिले की, त्याची बहीण मंदीपच्या अशा बाहेरख्यालीपणामुळेच तिचे लवकर लग्न लावले होते.
- बहिणीने लग्नानंतरही सासरी कुणाशीतरी संबंध बनवले म्हणून तिचा घटस्फोट झाला होता.
- दीड वर्षापासून ती माहेरात राहत होती. एका सावकाराशी - मुनीश गर्ग याच्याशी तिने लैंगिक संबंध बनवले होते.
- हे सर्व माझी पत्नी आणि गावकऱ्यांना पसंत नव्हते. यामुळे घरात नेहमी भांडणे होऊ लागली.
- अनेकदा बहिणीला समजावले, पण ती सुधरली नाही. मग मला काय करावे काहीच कळत नव्हते.
- मी आणखी बदनामी सहन करू शकत नाही. म्हणून मी हे पाऊल उचलत आहे.

Post a Comment

 
Top