0
‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या निवृत्त कारागृह अधीक्षकाची निर्घृण हत्या, पाय साखळीने बांधून मृतदेह ठेवला खोलीत

अमरावती -अमरावतीचे निवृत्त कारागृह अधीक्षक प्रेमनिखिल कृष्णा मित्रा (६७) यांचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह गुरुवारी (दि. १३) रात्री दहा वाजता त्यांच्याच घरात आढळून आला. त्यांचा खून करणाऱ्या अाराेपीला पोलिसांनी अवघ्या बारा तासांत अटक केली. सय्यद सैफ अली अफसर अली (१९) असे अाराेपीचे नाव अाहे. मित्रा यांची लहान मुलांसोबत असभ्य वर्तणूक होती, त्याचा हाच त्रास वारंवार होता. तो ब्लॅकमेलही करायचा, म्हणूनच त्याचा खून केल्याचे मित्रा यांच्या शेजारीच राहत असलेल्या अाराेपीने पाेलिसांना सांगितले.
प्रेेमनिखिल मित्रा यांचा मुलगा व पत्नी हे पुण्यात राहतात, तर मुलगी विदेशात असते. अाठ वर्षांपासून मित्रा एकटेच भाड्याच्या घरात राहत हाेते. गुरुवारी रात्री त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे शेजाऱ्यांनी पाेलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडले असता मित्रांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात व कुजलेल्या अवस्थेत पडून होता. त्यांचे पाय लोखंडी साखळीने बांधून ठेवले होते. अधिक चाैकशी केली असता मित्रा यांना दारूचे व्यसन असल्याचे समाेर अाले. दरम्यान, त्यांच्या खूनप्रकरणी पाेलिसांनी घराशेजारी राहणाऱ्या अफसर अली याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने अापल्याला काहीच माहिती नसल्याचे नाटक केले. मात्र, पाेलिसी खाक्या दाखवताच शुक्रवारी त्याने खुनाची कबुली दिली. मित्रा हे दारू पिऊन अनेकदा परिसरातील लहान मुलांना घरात बोलवायचे, त्यांना चॉकलेट देऊन त्यांच्यासोबत असभ्य वर्तन करायचे, मारेकरी सय्यदचे मित्रांकडे जाणे- येणे होतेच. तो गेला नाही तर मित्रा त्याला धमकी देत होते. या त्रासाला कंटाळूनच खून केल्याचे आरोपीने सांगितले.
खून करून अाराेपी नागपूरला पळाला
सय्यद सैफ अली याने १० जुलैच्या रात्री मित्राच्या घरात जाऊन दांड्याने त्यांच्या डोक्यात मारले तसेच गळ्यावर पाय ठेवला. लोखंडी साखळीने त्यांचे पाय बांधून ठेवले. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून निघून गेला. पाेलिसांच्या भीतीने अाराेपी अापल्या काही साथीदारांना घेऊन नागपूरला गेला. तत्पूर्वी एका सुवर्णकाराकडे जाऊन त्याने सोन्याच्या दोन अंगठ्या मोडून रक्कम घेतली होती. या पैशातून त्याने नागपुरात माैजमजा केल्याचीही कबुली दिली.

Post a Comment

 
Top