मुंबईः 'दंगल' आणि 'बाहुबली' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक जुने रेकॉर्ड मोडित काढून नवीन इतिहास रचला आहे. पण सध्या 'इट' हा हॉरर चित्रपट या दोन्ही चित्रपटांना टक्कर देताना दिसतोय. दंगल या चित्रपटाने आतापर्यंत दोन हजार कोटींची तर बाहुबली सतराशे कोटींची कमाई केली. तर 8 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या इट या चित्रपटाने पहिल्या तीन दिवशीच वर्ल्डवाइड 791 कोटींची आणि आठवड्याभरात तब्बल 971 कोटींची कमाई केली आहे.
बजेटच्या आठपट केली कमाई...
लेखक स्टीफन किंगच्या हॉरर नॉव्हेलवर आधारित या चित्रपटाचे एकुण बजेट 224 कोटी इतके आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बजेटच्या एकुण आठपट कमाई केली आहे. एंडी मुशिएती दिग्दर्शित या चित्रपटाच्या कमाईचा आकडा बघता हा चित्रपट आगामी दिवसांत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की जगभरात बनणाऱ्या चित्रपटांमध्ये 20 टक्के केवळ हॉरर चित्रपट बनतात. हॉरर चित्रपटांचा वेगळा असा चाहतावर्ग आहे आणि त्यांची संख्याही लक्षणीय आहे पण समीक्षकांना हे चित्रपट फारसे आवडत नाहीत. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असे काही Horror चित्रपट ज्यांनी पुरस्कार जिंकून सर्व समीक्षकांचीही बोलती बंद केली होती. याचमुळे तुम्ही हे चित्रपट एकटे पाहण्याची रिस्क अजिबात घेऊ नका.

द एक्जॉरसिस्ट
1974 साली रिलीज झालेला 'द एक्जॉरसिस्ट' हा पहिला अमेरिकेन चित्रपट आहे, ज्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळाले होते. एका लहान मुलीला भूताने झपाटले असते आणि पादरी त्या भूताबरोबर कसा लढा देतो, याची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली होती. याच चित्रपटावरुन प्रेरणा घेऊन भारतीय दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी भूत हा चित्रपट बनवला होता.

Post a Comment