0
हत्येच्या 9 दिवसानंतर रेयान शाळा सुरु झाली आहे.

गुडगाव - रेयान इंटरनॅशन स्कलूमध्ये मुलाचा मृत्यू झाल्यानंतर 9व्या दिवशी (सोमवार) शाळा सुरु झाली आहे. यावेळी काही पालक आपल्या मुलांची टीसी घेण्यासाठी आले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या मुलांना आता या शाळेमध्ये शिकवायचे नाही. तर, काही पालकांचे म्हणणे आहे की ते आज मुलांना शाळेत पाठवणार नाही. ते फक्त मुलांची भीती कमी व्हावी या उद्देशाने मुलांना शाळेत घेऊन आले आहेत.
काय आहे प्रकरण
- गुडगाव येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वर्षांच्या मुलाचा शाळेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह सापडला होता. हत्येच्या आरोपात शुक्रवारी सायंकाळीच शाळेचा बस कंडक्टर अशोक कुमारला अटक करण्यात आली होती. आरोपी अशोक 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कामाला लागला होता. 
- अशोकने माध्यमांना सांगितले की माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी टॉयलेटमध्ये चुकीचे काम करत होतो. ते मुलाने पाहिले आणि मग मी त्याला धक्का दिला. नंतर आत ओढले. तर तो ओरडाओरड करायला लागला. त्यामुळे घाबरून मी चाकूने त्याचा गळा चिरला.
- पालकांचा दबाव आणि पंतप्रधान कार्यालयाने दट्ट्या दिल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

Post a Comment

 
Top