0
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाबाहेर का झाली चेंगराचेंगरी?; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली ही 8 कारणे

मुंबई-मुंबईतील एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. दादरनंतरचे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे दुसरे रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणाहून रोज 3 लाख लोक ये-जा करतात. हा पुल 104 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. एलफिन्स्टन हे स्थानक वरळी आणि प्रभादेवी या भागांना जोडते. काही दिवसांपूर्वी या स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्यात आले. या घटनेबद्दल प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीमुळे चेंगराचेंगरीची वेगवेगळी कारणे पुढे येत आहेत.
आगीची ठिणगी उडाल्याने धावू लागले लोक
1) शॉर्ट सर्किटने झाला स्फोट
- काही लोकांनी पुलाच्या एका भागात आगीची ठिणगी उडाल्याचे पाहिले त्यानंतर ते आग लागल्याचे सांगत धावू लागले. तर काही लोकांनी पुलावर करंट लागत असल्याची अफवा ऐकली.
2) पुलाचा एक हिस्सा कोसळल्याची अफवा
- काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पुलाचा एक हिस्सा कोसळल्याची माहिती मिळाली त्यानंतर प्रवाशांनी पुलावरुन उड्या मारल्या.
3) जास्त गर्दी असल्याने घडली घटना
- अतिरिक्त पोलिस आयुक्त एस. जयकुमार यांनी सांगितले की, पुलावर एकाचवेळी जास्त लोक आल्यानेच चेंगराचेंगरी झाली.
4) पावसापासून वाचण्यासाठी लोक आले पुलावर
- मुंबईत आज पाऊस सुरु होता. पावसापासून वाचण्यासाठी बरेच लोक पुलावरच थांबले होते. पाऊस थांबल्यावर लोक बाहेर पडु लागले. त्याचवेळी वेळी अनेक अफवा पसरल्याने चेंगराचेंगरी झाली.
5) एकाचवेळी 4 ट्रेन आल्या
- चेंगराचेंगरी झाली त्याच्या काही वेळ आधी 4 लोकल स्टेशनवर आल्या होत्या. त्यामुले पुलावर खूपच गर्दी झाली.
6) एक माणूस पडल्यावर झाली चेंगराचेंगरी
- एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पावसामुळे चारही ठिकाणाहून पाणी येत होते. त्यावेळी एक माणूस घसरला आणि चेंगराचेंगरी सुरु झाली. काहींनी पळापळी सुरु केल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
7) एका व्यक्तीला दम्याचा अॅटॅक आला आणि अफवा पसरल्या
- पूलावर असणाऱ्या एका व्यक्तीला दम्याचा अॅटॅक आला. त्या व्यक्तीला काही लोक मदत करत होते. त्याचवेळी काही विपरित घडल्याची अफवा पसरली आणि चेंगराचेंगरी सुरु झाली.
8) पुढील लोक घसरल्याने मागील लोक त्यांच्यावर पडले
- पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकड यांनी सांगितले की, पावसामुळे पुलाचा निसरडपणा आला होता. त्यावेळी काही लोक या पुलावरुन घसरले. त्यानंतर मागील लोक त्यांच्यावर पडले. आज नवमी आणि पाऊस असल्याने लोकांची संख्याही जास्त होती.
लोकांचा आरोप : अर्ध्या पुलावर हॉकर्सचा कब्जा, पोलिस घेतात हफ्ता
- लोकांचा आरोप आहे की, पुलाच्या अर्ध्या भागावर हॉकर्सचा कब्जा आहे. पोलिसावाले त्यांच्याकडून हफ्ता घेतात. रेल्वेही त्यांना येथून हटवण्यासाठी काहीही करत नाही. त्यामुळे ही घटना घडली.
104 वर्षात वाढली गर्दी पण नवा पूल झाला नाही
- हा पूल 104 वर्ष जुना आहे. तो खूपच अरुंद आहे. काळानूसार येथे गर्दी वाढत गेली. पुलावर यापूर्वीही काही घटना घडल्या आहेत. स्थानिकांनी नव्या पुलाची मागणी केली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Post a Comment

 
Top