0
या मंदिरात मुलींना ठेवले जाते टॉपलेस, शेकडोंतून होते 7 जणींची निवड

चेन्नई - तामिळनाडूच्या मदुरईमध्ये परंपरेच्या नावावर कमी वयाच्या मुलींना टॉपलेस करून 15 दिवसांपर्यँत येजहायकथा अम्मान मंदिरात (Yezhaikatha Amman temple) ठेवले जाते. येथे त्यांना देवी रूपात सजवून पूजा केली जाते. परंतु शरीराच्या वरच्या भागावर कोणतेही कापड घातले जात नाही. तथापि, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दखल देत मुलींचे शरीर पूर्ण कपड्यांनी झाकण्याचे आदेश दिले आहेत. सोबत कुटुंबीयांनाही मुलींसह राहण्याचे आदेश दिले आहेत.
60 हून अधिक गावांतील लोक सहभागी...
- वास्तविक, येथे जुन्या चालीरीतींच्या नावावर 7 वा त्याहून अधिक मुलींना देवी रूपात सजवले जाते.
- यादरम्यान त्यांच्या शरीराच्या वरच्या भागाला निर्वस्त्र केले जाते. तर कमरेच्या खाली धोतरासारखे वस्त्र घालू दिले जाते.
- या परंपरेअंतर्गत मुदरईच्या आसपास तब्बल 60 हून जास्त गावांतील लोक सामील असतात.
- त्या मुलींना (ज्यांचे पीरियड्स सुरू झालेले नाहीत) देवी रूपात 15 दिवस अम्मान मंदिरात जाऊन पूजले जाते.
- हे एकप्रकारे 1988 मध्ये बंदी घातलेल्या देवदासी प्रथेचेच एक रूप आहे.
- या मुलींना घरापासून दूर ठेवून 15 दिवस शिक्षणापासूनही वंचित ठेवले जाते. हा पूर्ण सण-समारंभ संपल्यावर पाच मुले त्या मुलींचे कपडे काढून टाकतात, ज्यामुळे त्या पूर्णपणे निर्वस्त्र होतात.
कोणताही वाईट प्रकार होत नाही
- स्थानिक लोक मानतात की, या पंधरा दिवसांत मंदिरात राहताना या मुलींसोबत कोणताही वाईट प्रकार होत नाही.
- या पंधरवड्यात अम्मान मंदिराचे पुरुष पुजारी त्या मुलींची देखभाल आणि सुरक्षेची जबाबदारी उचलतात.
- मुदरईच्या डीएमके वीरा राव यांचे म्हणणे आहे की, ही 200 वर्षे जुनी परंपरा आहे. यासाठी कुटुंबीय मर्जीने आपल्या मुलींना मंदिरांत पाठवतात. आम्हाला आतापर्यंत कोणतीही तक्रार मिळालेली नाही.
- तथापि, आता जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलींच्या अंगावर पूर्ण कपडे घालायला लावण्याचे आदेश काढले आहेत.
नोटीस जारी
- दुसरीकडे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणी तामिळनाडू सरकारला नोटीस जारी केली आहे आणि चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
- आयोगाने म्हटले की, जर मुलींना टॉपलेस ठेवण्याचे प्रकरण खरे असेल तर हे मानवाधिकारांचे थेट उल्लंघन ठरते.

Post a Comment

 
Top