0
असा असेल देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा मार्ग; 7 किलोमीटर समुद्राखालून धावणार


मुंबई- जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आजपासून (बुधवारी) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. दोन्ही दिवस ते गुजरातमध्येच राहतील. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद आणि गांधीनगरला नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. आज (गुरुवारी) पंतप्रधान मोदींसोबत ते भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची कोनशिला ठेवली. त्यानंतर दोन्ही नेते बाराव्या भारत-जपान वार्षिक बैठकीत सहभागी होतील. त्या वेळी संरक्षण, समुद्री सुरक्षेसमवेत अनेक मोठे करार होण्याची अपेक्षा आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच राजधानीच्या बाहेर दोन देशांत द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमीपूजन...

- नरेंद्र मोदी आणि शिंजो अॅबे यांनी आज (14 सप्टेंबर) अहमदाबादमध्ये अहमदाबाद-मुंबई- हाय स्पीड रेल्वे (एमएएचएसआर) प्रकल्पाचे (अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन) भूमीपूजन केले. सुरक्षितता, वेग आणि लोकसेवेच्या दिशेने जाणार्‍या नव्या युगाला सुरुवात झाली आहे. सोबतच भारतीय रेल्वेचा विस्तार आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि जपानमध्ये महत्त्वपूर्ण करार करण्‍यात आले आहेत.

कसा आहे हा प्रस्ताव...
- जेआयसीए (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, या रेल्वे कॉरीडोरचा सर्वाधिक भाग उंच ट्रॅकवर बनवण्याचा प्रस्ताव आहे.
- ठाणे ते विरारदरम्यान हा कॉरीडोर समुद्राखालून बनवण्यात येणार्‍या 7 किलोमीटर बोगद्यातून जाईल.
- या प्रोजेक्टसाठी अंदाजे 97,636 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
- हायस्पीड रेल्वे कॉरीडोरच्या कामास 2018च्या शेवटी सुरुवात होईल.

बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर एक दृष्टीक्षेप...
- मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावेल देशातील पहिली बुलेट ट्रेन. 505 किलोमीटर अंतर
- 300 KMPH च्या गतीने धावेल बुलेट ट्रेन.
- 98 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. त्यापैकी 81 टक्के रक्कम जपान देणार
- मुंबई-अहमदाबाद दरम्यान 11 बोगदे. त्यापैकी एक समुद्रातून
- 1 टक्कयांपेक्षाही कमी व्याजदराने जपानने भारताला कर्ज देण्यात आला आहे. 50 वर्षांत ही परत फेड करावी लागेल.

असा असेल बुलेट ट्रेनचा मार्ग... 
- साबरमती (गुजरात)
- अहमदाबाद
- बडोदा
- भरूच
- सुरत
- बिलिमोरा
- वापी
- विरार
- ठाणे
- वांद्रे (मुंबई)

Post a Comment

 
Top