0
OMG: येथून दरमहा निघते 60 किलो सोने, अशी होते दररोज चोरी...

इंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलच्या क्रेपूरिजाओ गावातील ही दृश्ये आहेत. येथे राहणारे लोक केवळ सोने काढण्याचे काम करत असतात. बेकायदा असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून हे काम सर्रास केले जाते. लाख प्रयत्न करून पोलिस सुद्धा यांना रोखण्यात अपयशी ठरले आहेत. गोल्ड माइंस अॅमेझॉन फॉरेस्टच्या घातक प्राण्यांनी भरलेल्या नदीच्या आस-पास आहेत.

दरमहा काढल्या जाते 60 किलो सोने
- सोन्याच्या खाणी असलेले हे ठिकाणी रेन्सा या नावाने ओळखल्या जाते. हजारो आदिवासी या ठिकाणी दररोज सोने चोरण्यासाठी एकवटतात. 
- अवघ्या 5 वर्षांपूर्वी या लोकांचा उदरनिर्वाह केवळ मासेमारी आणि शिकारांवर चालत होता. मात्र, सोन्याच्या खाणींचा पत्ता लागताच या लोकांचे भाग्य बदलले. 
- पाहता-पाहता सगळेच या कामात मशगूल झाले. सकाळ होताच, या लोकांचा पहिले काम म्हणजे येथील सोने शोधून काढणे होय. काही स्थानिक आदिवासी रात्री सुद्धा हेच काम करतात. जणू त्यांना ते करण्याचे व्यसनच लागले आहे. 
- नुकतेच समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, हे आदिवासी लोक दररोज 2 किलो सोने काढत आहेत. अर्थात एका महिन्यात या ठिकाणावरून 60 किलो सोने उरकले जात आहे. 
- काहींनी तर येथे येण्याचे कष्ट टाळण्यासाठी याच ठिकाणी लाकडी घरे बांधली आहेत.

परवाना देण्याच्या तयारीत सरकार
- खाणकाम आणि ऊर्जा मंत्री फर्नांडो कोएलहो यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार या लोकांना सोने काढण्यासाठी लायसन्स देण्याचा विचार करत आहे. जेणेकरून सोने काढण्यासाठी मेहनत करणाऱ्या आदिवासींना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू शकेल. 
- पकडल्या जाण्याच्या भितीने आदिवासी लोक कित्येक किलो सोने दलालांना अगदी कमी किमतींमध्ये विकून मोकळे होते आहेत. परवाना मिळाल्यानंतर ते हेच सोने बाजारभावात विकू शकतील. 
- विशेष म्हणजे, या आदिवासींच्या गावात सापडलेले सोने सरकार काबिज करणार नाही. तसेच त्यांना त्या ठिकाणावरून दूर करणार नाही असे आश्वासन सुद्धा मंत्र्यांनी दिले आहेत.

Post a Comment

 
Top