0
पकडल्यानंतर सर्व महिलांनी पोलिसांची गयावया केली, पण महिला पोलिसांनी त्यांना अटक केली.
या महिला अट्टल जुगारी बनल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

इंदूर - येथे क्राइम ब्रँचने एका फ्लॅटवर छापा मारून जुगार खेळणाऱ्या 6 महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 हजार रोख, मोबाइल फोन आणि लाखोंचे कॅसिनोचे नाणे जप्त केले आहेत. पोलिस सूत्रांनुसार, जगाराच्या या अड्ड्याचे संचालन एक महिला आपल्या घरी करत होती. तिने आसपासच्या अनेक महिलांना लालूच दाखवून पक्क्या जुगारी बनवले होते. पोलिसांनी या महिलांशिवाय या जुगाराच्या आयोजनात सहभागी असलेल्या इतर एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे.

नवऱ्याला झाला लकवा, मग पत्नी बनली जुगारी...
- क्राइम ब्रांचचे अॅडिशनल एसपी अमरेंद्र सिंह म्हणाले की, पोलिसांना याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. राजेंद्रनगरच्या सहज अपार्टमेंटमध्ये एक महिला जुगार आणि सट्टा चालवत होती. या माहितीवरून पोलिसांनी साध्या वेशात अगोदर येथील टेहळणी केली.
- टेहळणी करणारे जवान म्हणाले की, एका फ्लॅटमध्ये दुपारच्या वेळी काही महिला येतात आणि मग फ्लॅटचा दरवाजा आतून बंद करून घेतात. या महिला दोन-तीन तासांनी येथून निघून आपापल्या घरी चालल्या जातात. येथे येणाऱ्या महिलांमध्ये आसपास राहणाऱ्या महिलांशिवाय लांबूनही काही जणी जुगार खेळायला यायच्या.
हैराण झाले पोलिस
- रेकी केल्यानंतर महिला पोलिसांना सोबत घेऊन या फ्लॅटवर धाड टाकण्यात आली. फ्लॅटचा दरवाजा उघडायला लावून पोलिसांनी डोकावले असता पोलिस हैराण झाले आणि जुगारी महिलाही. आत एका रूममध्ये चांगल्या घरातल्या काही महिला बेडवर बसलेल्या होत्या. काहींच्या हातात कॅसिनोचे नाणे होते तर काहींच्या हातात नोटा होत्या. पोलिसांनी फ्लॅट मालक सोनियाची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांना सोनिया म्हणाली की, काही महिन्यांपूर्वी तिच्या नवऱ्याला लकवा झाला होता, यानंतर त्यांचा जास्त वेळ घरातच जाऊ लागला. उत्पन्नाचे काही साधन नव्हते. त्या वेळी एक महिला माझ्या संपर्कात आली. तिचा सल्ला ऐकून मी हे काम सुरू केले.
- पोलिसांना पाहून महिलांनी हातापाया पडणे सुरू केले. महिला म्हणत होत्या, हे सगळे तुम्ही ठेवून घ्या, पण आम्हाला सोडा. परंतु महिला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी येथून सोनिया दादवानी, सुनीता चेलानी, आरती जेसवानी, पुष्पा भाटिया, नीता जेसवानी, सरिता तलरेजा आणि त्यांच्यासोबतच हितेश रामचंदानी यांना अटक केली आहे.
- पोलिसांनुसार या सर्व महिला अट्टल जुगारी बनल्या आहेत. पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

 
Top