0
मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही- राज ठाकरेंची धमकी, 5 तारखेला चर्चगेटवर मोर्चा

मुंबई- भारताला कोणत्याही शत्रूंची गरज नाही. आपली व्यवस्थाच रोज शेकडो लोकांना मारतेय. मुंबई शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळेच ही स्थिती निर्माण झाली असून, त्यांना रोखल्याशिवाय मुंबईतील प्रश्न सुटणार नाहीत. सोबतच पायाभूत सुविधांवर भर द्यावा लागेल. भाजप आणि काँग्रेस सरकार आले किंवा गेले त्यामुळे काहीही फरक पडत नाहीत. मी कालच्या दुर्घटनास्थळी मुद्दाम गेलो नाही. मला तेथे जाऊन सुरक्षा व्यवस्थेवर ताण आणायचा नव्हता. मात्र, या सर्वाचा निषेध म्हणून येत्या 5 ऑक्टोबर रोजी चर्चगेट येथे मनसेचा मोर्चा काढला जाईल. त्यात मी स्वत: सहभागी होऊन नेतृत्त्व करणार आहे असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत बुलेट ट्रेनची एक टक्काही गरज नाही. मुंबईत व महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, अशी धमकीही राज ठाकरेंनी यावेळी दिली.
मुंबईत शुक्रवारी एलफिस्टन-परेल पुलावर चेंगराचेंगरी होऊन 22 लोक मृत्यूमुखी पडले तर 36 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
काय काय म्हणाले राज ठाकरे-
- काँग्रेस सरकार असताना फुटपट्टी घेऊन फलाटाची उंची व रूंदी मोजणारा खासदार किरीट सौमय्या आता कुठे गेलायं?
- सरकार कोणाचेही असो, भाजप किंवा काँग्रेस यांना मुंबईचे काहीही देणे घेणे नाही
- आमचे काही लोक (संजय गवते) एलफिस्टन-परेल पुलाच्या कामासाठी मागील 15 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत.
- मुंबईत काम करणा-या अनेक सरकारी यंत्रणा, पण कोणालाही कोणाचाही ताळमेळ नाही. 
- मुंबईत चालणे मुश्किल आहे मग बुलेट ट्रेन कशाला पाहिजे मुंबईत. मुंबईत बुलेट ट्रेनची एक टक्काही गरज नाही.
- मुंबईत व महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही.
- मोदींनी तिकडे गुजरातमध्ये काय करायचे ते करावे. आम्ही बुलेट ट्रेन नको म्हणजे नको.
- बुलेट ट्रेनबाबत जोर, जबरदस्ती झाली तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ..
- कालच्या दुर्घटनास्थळी जाऊन मला तेथील यंत्रणांवर ताण वाढवायचा नव्हता. नेत्यांच्या मागे-पुढे करण्यात निम्मी यंत्रणा कामी लागते व मुख्य विषय बाजूला पडतो.
- मुंबई स्पिरीट, मुंबई स्पिरीट किती असे किती म्हणवून फसवून घेणार आहोत मुंबईत. प्रत्येकाला पोटाची खळघी भरण्यासाठी दुस-या दिवशी कामावर जावेच लागते.
- शहरात अनेक अनधिकृत गोष्टी सुरु आहेत. त्यावर कोणाचे नियंत्रण आहे का?
- मुंबई, पुणे शहरांवर देशभरातील लोकांचे लोंढ्यांचे लोंढे येत आहेत त्याला कोणी रोखणार आहे का?
- मोदी सरकार खोटे बोलून सत्तेत आले आहेत, इतका खोटं बोलणारा पंतप्रधान देशाने आतापर्यंत पाहिला नव्हता.
- खोटी आश्वासने देणार, जनतेला भूलविणार आणि अमित शहा येऊन हा चुनावी जुमला होता असे सांगणार याला काही अर्थ आहे काय?
- सुरेश प्रभू चांगले काम करत होते. त्या छोट्या छोट्या गोष्टीवर काम करत होते. पण त्यांचा बुलेट ट्रेनला विरोध होता. म्हणून त्यांना मोदींनी हटविले व पियूष गोयल यांना आणले. गोयल पूर्वी काय टीसी म्हणून काम पाहत होता का?

Post a Comment

 
Top