- यूपीच्या गोरखपूरमध्ये बुधवारी रात्री शहापूरच्या रेल्वे डेअरी कॉलनीतील सेंट अँथनी कॉन्व्हेंट स्कूलच्या 5वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. एका महिला शिक्षिकेने त्याचा छळ केल्याचा आरोप आहे. मुलाने चिठ्ठीही लिहून ठेवली आहे, यात त्याने त्याच्या वर्गशिक्षिकेवर कडक शिक्षा करण्याचा आरोप केला आहे.
वर्गशिक्षिकेने नग्न करून केली होती मारहाण...
- शहापूर परिसरातील मोहनापूर पादरीबाजारच्या राहणाऱ्या रवी प्रकाश यांचा 12 वर्षांचा मुलगा नवनीत प्रकाश डेअरी कॉलनीतील सेंट अँथोनी शाळेत 5वीचा विद्यार्थी होता.
- आरोप आहे की, नवनीतला त्याच्या एका शिक्षिकेने 15 सप्टेंबर रोजी शाळेत 3 तास बेंच उभे केले होते. त्याआधी गोपा नावाच्या शिक्षिकेने त्याला नग्न करून मारहाण केली होती.
- नवनीत 15 सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यावर घरी गेला. मग त्याने विषारी पदार्थ खाल्ला. नवनीतला उपचारांसाठी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले होते, तेथे बुधवारी संध्याकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
चिठ्ठीत हे होते लिहिलेले...
- चिमुकल्याच्या मृत्यूनंतर पालकांनी त्याचा मृतदेह घरी आणल्यावर त्यांना त्याच्या स्टडी टेबलपाशी एक सुसाइड नोट सापडली. यात मती गुंग करणारा मजकूर होता.
- यात लिहिले होते की- ''15 सितंबर को मेरा पहला एग्जाम था, मेरी मैम (क्लास टीचर) ने मुझे बहुत रुलाया। मुझे खड़ा रखा क्योंकि वो चापलूसों की बात सुनती हैं।''
- ''उनकी किसी बात का विश्वास मत करिएगा। कल उन्होंने मुझे 3 पीरियड तक खड़ा रखा था।''
- '' आज मैंने ये सोच लिया है कि मैं मरने वाला हूं। मेरी आखिरी इच्छा है कि मेरी मैम किसी बच्चे को इतनी बड़ी सजा न दें।''
- शेवटी लिहिले होते - ''अलविदा! पापा-मम्मी और दीदी।''
पालकांनी शाळेत केली तोडफोड
- नवनीतच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक हळूहळू शाळेत जमायला लागले. आक्रोश करणाऱ्या कुटुंबीयांनी शाळेत गोंधळ घातला आणि तोडफोडही केली.
- घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांशिवाय मोठ्या संख्येने फोर्स शाळेत येऊन धडकली. पोलिसांनी कुटुंबीयांची समजूत घालून त्यांना शांत केले. मृत विद्यार्थ्याच्या पालकांच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

काय म्हणतात पोलिस?
गोरखपूरचे एसपी विनयकुमार सिंह म्हणाले, याप्रकरणी जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई नक्कीच केली जाईल. मुलाच्या वर्गशिक्षिकेला गुरुवारी सकाळी शाळा सुरू होताच अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.
- याशिवाय मुलाचे हस्ताक्षरही जुळवून पाहिले जात आहेत. जर खरेच हे चिमुकल्याचे हस्ताक्षर असेल तर खुनाचा गुन्हा दाखल होईल.

Post a Comment