0डोंबिवली, दि. 18 - डोंबिवली-कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या सोनारपाडा परिसरात राहणा-या प्रभाकर मिरपगारे (55) या सेवानिवृत्ताने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी मिरपगारे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मिरपगारे यांच्या शेजारी राहत असलेल्या 11 वर्षाच्या मुलीला मिरपगारे याने टीव्ही बघण्यासाठी घरी नेले होते. टीव्ही बघण्याऐवजी मुलीला त्याने बेडरुममध्ये नेले. तिला गादीवर झोपवून तिच्यासोबत अश्लील चाळे केले.  हा प्रकार कोणाला सांगू नकोस असा मुलीला दम भरला. मुलगी घरी परतली तेव्हा मुलीने हा प्रकार घरी आईला सांगितला. आईने या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंग करणा:या मिरपगारेला अटक केली आहे. 

Post a Comment

 
Top