

परमेश्वराने प्रत्येक जिवाच्या निर्मितीसाठी एक निश्चित वेळ ठरवलेली आहे. गर्भात 9 महिने राहिल्यानंतर बाळ पूर्ण विकसित होऊन जन्म घेते. त्याआधी जन्मलेल्या बाळाला अविकसित म्हटले जाते. अमेरिकेत दरवर्षी तब्बल 10 लाख प्रेग्नंट महिला प्री-टर्म लेबर किंवा मिसकॅरेजची शिकार होतात. पेन्सिल्व्हानियातील एका महिलेने आपल्या ब्लॉगमध्ये अवघ्या 5 महिन्यांत जन्मलेल्या बाळाचे फोटोज शेअर करून लोकांच्या डोळ्याला पाणी आणले.
छातीतून दिसत होते धडधडणारे हृदय
- 30 वर्षीय अॅलेक्स फ्रेट्झने गर्भावस्थेच्या अवघ्या 19 आठवड्यांतच तिच्या तिसऱ्या बाळाला जन्म दिला. तिने बाळाचे नाव वॉल्टर जोशुआ फ्रेट्झ ठेवले. जन्मानंतर काही वेळानेच वॉल्टरचा मृत्यू झाला होता. अॅलेक्सने आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या बाळाची कहाणी फोटोसह शेअर केली होती. ही नंतर लाखो लोकांनी शेअर केली. अॅलेक्सला 19व्या आठवड्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. तिला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेने बाळाला गर्भाबाहेर काढले. तेव्हा वेळेपूर्वीच जन्मलेले हे बाळ हाताच्या पंजाहूनही छोटे होते. सोबतच त्याची स्किन इतकी पारदर्शक होती की, आत धडधडणारे हृदयही स्पष्ट दिसत होते.
थोडा वेळच जिवंत राहिले
- वॉल्टरने जगात पाऊल ठेवताच डॉक्टरांनी त्याला त्याच्या आईच्या कुशीत ठेवले. यानंतर डॉक्टर तिथून निघून गेले. ते या कुटुंबाला थोडा वेळ देऊ इच्छित होते. अॅलेक्सने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, तो खूप नॉर्मल दिसत होता. त्याचे हात-पाय पूर्णपणे विकसित झाले होते. अॅलेक्सने त्याला आपल्या छातीशी लावले. त्यांना माहिती होते की, या बाळाकडे आता जास्त वेळ नाहीये म्हणून त्याच्या वडिलांनीही त्याला आपल्या छातीशी घेतले. वॉल्टरच्या बहिणीनेही त्याच्यासोबत काही वेळ घालवला. मग या अवघ्या 5 महिन्यांत जन्मलेल्या बाळाने जगाचा निरोप घेतला.
Post a Comment