0
विवाहानंतर फक्त 4 दिवसांतच चंदन पळून गेला.
निक्कीचे चंदनशी नुकतेच लग्न झाले होते.

भगवानपूर - प्रियकरासह पकडण्यात आलेल्या प्रेयसीचे गावकऱ्यांनी लग्न लावून दिले. लग्नानंतर नवरा 4 दिवस सासरवाडीत राहिला आणि तेथेच मधुचंद्र साजरा केला. परंतु पाठवणीनंतर नवरा आपल्या नवरीला रस्त्यातच सोडून पळून गेला. प्रियकराकडून मिळालेल्या या धोक्यामुळे निक्की तणावात आहे आणि त्याला चांगलाच धडा शिकवू इच्छिते. निक्की म्हणाली की तिचा प्रियकर चंदनने लग्नाचे आमिष दाखवून मला जवळ बोलवायचा आणि आता लग्न झाल्यावर मात्र सुहागरात साजरी करून तो पळून गेला.

लग्नानंतर असा फरार झाला चंदन
- ही घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील रतनपुरा गावातील आहे. पीडित नववधू निक्की म्हणाली की, 10 सप्टेंबर रोजी रात्री ती आपल्या प्रियकराला भेटायला गावाबाहेर गेली होती. याचा पूर्ण गावात बोभाटा झाला. गावकऱ्यांनी आम्हाला दोघांना रंगेहाथ पकडले. आणि आमचे लग्न लावून दिले. लग्नानंतर सर्व विधी माझ्या माहेरातच झाले. यादरम्यान 4 दिवस आम्ही घरात पती-पत्नी बनून राहिलो. लग्नामुळे चंदनही खूप खुश होता.
- निक्की म्हणाली की, चंदन आणि त्याच्या घरातील लोकांनी माझा स्वीकार केला नाही. लग्नाच्या 5 दिवसांनी मला त्याच्या घरी म्हणजेच माझ्या सासरी नेण्यासाठी चंदन तयार झाला नाही.
- पोलिस, सरपंच आणि गावातील इतर लोकांनी दबाव टाकल्याने शुक्रवारी संध्याकाळी चंदन तयार झाला. मग कुठे आम्ही निघालो. वाटेत तो सारखा त्याच्या मित्रांना फोन लावत होता आणि काहीतरी प्लॅनिंग करत होता.
- गाडी रहसा चौकात पोहोचली तेव्हा मी पाहिले की, काही तरुण एका दुकानाबाहेर उभे होते. माझा नवरा चंदनने त्यांना इशारा केला की तो या कारमध्ये आहे आणि पुढे जात आहे.
- आमची कार सुनसान जागी पोहोचताच पाठोपाठ बाइकवरून अनेक जण कारजवळ आले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्यासाठी मजबूर केले.
- कार थांबताच चंदन गेट तोडून बाहेर निघाला आणि बाइकवर बसून आपल्या मित्रांसह पळून गेला.

आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याने लावले होते लग्न
- अर्ध्या रात्री प्रियकराला भेटायला गावाबाहेर गेलेली निक्की कुमारीला गावकऱ्यांनी तिचा प्रियकर चंदन कुमारसह एका शेतात आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. ही घटना 10 सप्टेंबरच्या रात्रीची आहे.
- रात्रीच तरुणीच्या नातेवाइकांनी गावकऱ्यांच्या मदतीने चंदन आणि निक्कीचे लग्न लावले होते.
- पण नवरदेव मात्र सुहागरात साजरी करून पळून गेल्याचा आरोप निक्कीने केला आहे

Post a Comment

 
Top