0
याच स्कॉर्पिओने गाडीने 4 जणांना उडवले.

औरंगाबाद- मॉर्निंग वॉक करणार्‍या चौघांना भरधाव स्‍कॉर्पिओने चिरडल्‍याची धक्‍कादायक घटना आज (शनिवारी) सकाळी 6.30 वाजता घडली. जालना रोडवरील केंब्रिज स्कूलजवळ ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. अपघातातील सर्व मृत हनुमान चौक, चिकलठाणा येथील रहिवासी आहेत.
अपघातातील मृतांची नवे
1. भागिनाथ लिंबाजी गवळी 
2. नारायण गंगाराम वाघमारे 
3. दगडुजी बालाजी ढवळे 
4. अनिल विठ्ठल सोनवणे 

Post a Comment

 
Top