0
ही देशातील पहिली लक्झरी हिल सिटी आहे.
अॅम्बी व्हॅली रात्रीच्या वेळी अशी दिसते.

मुंबई/पुणे- सहारा समूहाच्या अॅम्बी व्हॅली खरेदीत फक्त 2 कंपन्यांनी इंटरेस्ट दाखवला आहे. हा लिलाव 10 ते 11 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. याची कमीत कमी किंमत 37,392 ठरविण्यात आली आहे. तर सहारा समूहाच्या म्हणण्यानूसार याची किंमत 1 लाख कोटी रुपये आहे. हा लिलाव सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली होणार आहे.

- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लिलाव प्रक्रियेसाठी गुंतवणूकदारांच्या वतीने केवायसी डिटेल्स देण्यात आल्या आहेत.
- रियल इस्टेट क्षेत्रातील तज्ञांच्या म्हणण्यानूसार ही मालमत्ता एकाच कंपनीकडून खरेदी करण्यात येण्याची शक्यता अतिशय कमी आहे.
11 नोव्हेंबर पर्यंत मागितली होती मुदत
- सुब्रत रॉय यांची याचिका सुप्रीम कोर्टाने 11 सप्टेंबर रोजी फेटाळली होती. 
- सुब्रत रॉय यांनी याचिकेत 1, 500 कोटी रुपयांपैकी 966.80 कोटी रुपये जमा करण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितली होती.

Post a Comment

 
Top