काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या हामिद करझई विमानतळावर दहशतवाद्यांनी अचानक जोरदार हल्ला सुरू केला. या हल्ल्यात किमान 20 ते 30 रॉकेट फायर करण्यात आले. सुत्रांच्या माहितीनुसार, हल्ला झाला तेव्हाच अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस आणि नाटोचे नेते जेन्स स्टोलटेनबर्ग अफगाणिस्तानला पोहोचले होते. या हल्ल्यात त्यांना इजा झाल्याचे अद्याप वृत्त नाही. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळावरील सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या. तसेच चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस भारत दौरा आटोपून बुधवारी अफगाणिस्तानात पोहोचले. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्याचा हा पहिला अफगाणिस्तान दौरा आहे.
- मॅटिस आपल्या अफगाणिस्तान दौऱ्यात तेथील राष्ट्राध्यक्ष, संरक्षण मंत्री आणि इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.
- अमेरिकन लष्कराने 2014 मध्ये शेवटची तुकडी अफगाणिस्तानातून काढली तेव्हापासून तालिबानने पुन्हा डोके वर काढले आहे. त्या समस्येवर लक्ष्य घालून अमेरिका आपले आणखी 3000 लष्करी प्रशिक्षक आणि लष्करी तज्ञ अफगाणिस्तान पाठवण्याची तयारी करत आहे. अफगाणिस्तानात सध्या 11000 अमेरिकन सैनिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या हेतूने थांबलेले आहेत.

Post a Comment