0


Image result for tomatoचंदिगड -पाकिस्तानमधील काही भागात टोमॅटोचे दर ३०० रुपये किलोवर पोहोचले आहेत तरीदेखील पाकिस्तानने भारतातून टोमॅटोची आयात करण्यास नकार दिला आहे. दोन्ही देशांतील संबंध खराब असल्यामुळे आयात करणार नसल्याचे पाकिस्तानचे अन्न व ग्राहक संरक्षणमंत्री सिकंदर हयात बोसन यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार सध्या देशात टोमॅटोची अत्यंत टंचाई आहे. दरवर्षी मागणी आणि पुरवठा यातील अंतर कमी करण्यासाठी भारतातून टोमॅटोची आयात केली जात होती. मात्र, पाकिस्तानने भारतातून आयातीला बंदी घातलेली आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यातील अंतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
पाकिस्तानमधील टोमॅटोची टंचाई इतकी वाढली की, लाहोर व पंजाबच्या काही शहरांमध्ये टोमॅटो ३०० रुपये किलोन, तर रावळपिंडी व इस्लामाबाद शहरात टोमॅटो २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वीच या शहरात टोमॅटो १०० ते १२० रुपये किलोने विक्री होत होते. सरकारने टोमॅटोची किंमत १३२ ते १४० रुपये प्रतिकिलो निश्चित केली आहे. भारतात मात्र टोमॅटोची १० ते ४० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. पाकिस्तान सरकारला बलुचिस्तान व सिंध भागातून टोमॅटोचे नवे उत्पादन बाजारात येण्याची अपेक्षा आहे. मात्र, हे पीक बाजारात येण्यासाठी अजून दोन ते तीन आठवड्यांचा वेळ लागेल. या दरम्यान पाकिस्तानी बाजारात कांद्याचाही तुटवडा जाणवायला लागला आहे. कांद्याचे दर १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. दुसरीकडे लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (एलसीसीआय) भारतातून आयात न करण्याच्या बोसन यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Post a Comment

 
Top